नरसिंहगाव येथे होणार सुसज्ज कोविड सेंटर ; मोहन माळी

0
18



कवठेमहांकाळ : कोरोना संसर्ग वाढलेच्या पार्श्वभूमीवर कवठेमहांकाळ तालुक्यातील नरसिंहगाव येथे नुतन होमिओपॅथी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या निसर्ग रम्य व आरोग्यदायी परिसरात शासनमान्य व व्हेंटिलेटर, ऑक्सीजन बेड असलेले कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे.कोविड हॉस्पिटलची सर्वतोपरी तयारी पूर्ण झाली आहे. दोन तीन दिवसात हे कोविड हॉस्पिटल सुरू होणार असल्याची माहिती कोविड केअर सेंटरचे संचालक मोहन माळी यांनी दिली आहे.






माळी म्हणाले,ठाणे, मुंबई येथील राष्ट्रीय आरोग्य न्याय संशोधन संस्था संचलित नुतन मेडिकल कॅम्पसच्या परिसरात सुसज्ज इमारतीत व सर्व स्वतंत्र विभागात कोविड सेंटर सुरू करणार आहोत.संस्थेचे आधार स्तंभ डॉ.रामलिंग माळी,संस्थेच्या अध्यक्षा डॉ. नुतन माळी व डॉ.ऋतुज माळी यांच्या नियोजनानुसार हॉस्पिटल सुरू होत आहे. ज्येष्ठ उद्योजक पोपटराव जगताप यांच्या सहकार्याने व तालुक्यातील डॉ.एस. वाय.भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड केअरमधील रुग्णावर उपचार केले जाणार आहेत.






जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांच्या आदेशानुसार जिल्हा आरोग्य विभागाच्या पथकाने व प्रशासनाने हवेशीर परिसर,इमारत,विविध स्वतंत्र विभाग,तज्ञ, अनुभवी व कोविड स्पेशालिस्ट डॉक्टर्स, आरोग्य दायी वातावरण,व्हेंटिलेटर ऑक्सीजन बेडसह सज्ज  सेंटरच्या जागेची पाहणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिलिंद पोरे,तहसीलदार बी.जे.गोरे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दत्तात्रय पाटील,उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.सतीश गडदे यावेळी उपस्थित होते.या कोविड सेंटरमध्ये मुंबईचे सुप्रसिद्ध धंन्वतरी डॉ.चेतन शिंदे,ठाणे येथील डॉ.ऋतूज माळी,कोविड तज्ञ डॉ.संदिप पाटील उपचार करणार आहेत.करणार आहेत. तसेच वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. बाजीराव शिंदे व व्यवस्थापक डॉ. अमोल पाटील काम पाहणार आहेत. मोहन माळी हे कोविड सेंटरचे संचालक आहेत.






कवठेमहांकाळ तालुक्यातील कोरोना बाधीत रूग्णांची वाढत आहे. त्यामुळे कोविड सेंटर सुरू करण्याची गरज असून नुतन मेडिकल कॅम्पस योग्य असल्याचे मत तहसीलदार बी.जे.गोरे यांनी व्यक्त केले.डॉ.रामलिंग माळी व संस्थेच्या सर्व संचालक मंडळाने सामाजिक बांधिलकीतून कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील कोरोना बाधीत रूग्णांची वाढती संख्या विचारात घेवून व ग्रामीण भागातील नागरिकांना जवळच्या जवळ शासन मान्य खर्चात सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला आहे.





प्रारंभी 50 ऑक्सीजन बेडची क्षमता आहे. कोरोना बाधीत रुग्णांची काळजी घेण्यात येणार आहे. रुग्णांना सकस आहार देण्यात

येणार आहे.मिरज पंढरपूर मार्गानजिक, जत सांगली रस्त्यावर कवठेमहांकाळ शहरापासून फक्त दोन कि.मी.अंतरावर नुतन मेडिकल कॅम्पसच्या परिसरात सुसज्ज इमारतीत व निसर्ग रम्य वातावरणात सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसामान्य गोरगरीब समाजातील जनतेला,बाधीत रूग्णांसाठी सर्वात मोठे कोविड हॉस्पिटल सुरु करण्याचा मानस राष्ट्रीय आरोग्य न्याय संशोधन संस्थेच्या चेअरमन डॉ. नुतन माळी यांनी व्यक्त

केला.



नरसिंहगाव येथील कोविड सेंटरची पाहणी करताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिलिंद पोरे व अधिकारी

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here