येळवीतील ओंकार स्वरूपा फौंडेशनकडून कोविड लसीकरण जनजागृती | मोफत हॅन्ड-सॅनीटायझरची व्यवस्था | प्रा.आ.केंद्राला सॅनिटायझरची भेट

0
10



येळवी : महात्मा बसवेश्वर जयंती व छत्रपती संभाजी राजे यांची जयंती साजरी करून ओंकार स्वरुपाने कोविड लसीकरण जनजागृतीला सुरूवात केली. महात्मा बसवेश्वर व छत्रपती संभाजी राजे यांच्या फोटोचे पूजन येळवीचे सरपंच विजयकुमार पोरे व उपसरपंच सुनील अंकलगी यांच्या हस्ते करण्यात आले. ओंकार स्वरूपा फौंडेशन कडून येळवी प्राथमिक आरोग्य केंद्राला सॅनिटायझर भेट देण्यात आले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ.अमोद भडभडे, डॉ. दत्तात्रय खडतरे, परिचारिका अनिता यादव, अनिता वाघमोडे, सुपरवायझर पांडुरंग खुडे, सोनवणे मॅडम,सुनील शिंदे तसेच संस्थेचे अध्यक्ष दिपक अंकलगी, सचिव तथा ग्रा.पं. सदस्य संतोष पाटील हे उपस्थित होते. 





कोविड-19 संकटाशी लढा देताना केंद्र व राज्य शासनाने प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत यापूर्वीच विविध साधनांच्या माध्यमाने प्रत्यक्ष लसीकरण करण्यास सुरुवात केली आहे या कामी सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असून राज्य शासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देत कोविड-19 लसीकरण जनजागृती अभियानास ओंकार स्वरूपाने सुरुवात केली.लसीकरणाविषयी पसरलेले गैरसमज आणि अफवाबाबत व जनतेला जागृत करून लसीकरणा बद्दल गैरसमज दूर करण्यासाठी. लसीकरण जनजागृती बाबत गावात डिजिटल पोस्टर लावून तसेच छायाचित्र जाहिरातीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. त्याचबरोबर गृहभेटी देऊन लसीकरणाचे महत्व ज्येष्ठ नागरिकांना तसेच युवकांना समजून सांगण्यात आले.


       




सर्वांनी या लसीकरण मोहिमेचा लाभ निसंकोचपणे घ्यावा. आपल्या देशात लसीकरण जोमाने सुरू आहे याबद्दल कोणतीही भिती न बाळगता लसीकरणाला साथ देण्याचे आव्हान संस्थेचे सचिव तथा ग्रां.पं.सदस्य संतोष पाटील यांनी केले.






■ पर्यावरणाचा संदेश देणारे व्हॅक्सीन फोटो पॉइंट…

            ओंकार स्वरूपा फौंडेशन संस्थेतर्फे पर्यावरणाचा संदेश देणारे व्हॅक्सीन फोटो पाॅईट तयार करण्यात आले व त्याचा लोकार्पण सोहळा करण्यात आला. अनेक युवक कोविड लस घेतल्यानंतर या व्हॅक्सीन फोटो पॉईंट मध्ये फोटो काढून सोशल मीडियाद्वारे आपला फोटो दाखवुन आनेक नागरिकांना लस घेण्यास प्रोत्साहीत करतील. हा व्हॅक्सीन फोटो पाॅईट प्राथमिक आरोग्य केंद्र येळवी येथील लावण्यात आला आहे. यामुळे लसीकरणाबाबत चे गैरसमज दूर होऊन लसीकरणाचा टक्का वाढण्यास मदत होईल. असे मत संस्थेचे अध्यक्ष दिपक (आण्णा) अंकलगी यांनी व्यक्त केले. 






■ मोफत हॅन्ड- सॅनिटायझर ची व्यवस्था….

            कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असून, येळवी गाव व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी इतर गावातील नागरिक येळवी गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर येत-जात असतात. तसेच येळवी गावातील बहुतांश लोक वाड्या-वस्त्या वरती राहतात. या लोकांची व्यवस्था म्हणून ओंकार स्वरूपा फौंडेशन संस्‍थेने येळवी ग्रामपंचायत समोर हॅन्ड-सॅनीटायझ स्टॅन्ड ठेवून मोफत हॅन्ड-सॅनीटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे संसर्ग रोखण्यासाठी मदत होईल. असे मत संस्थेचे आधारस्तंभ येळवीचे उपसरपंच सुनील अंकलगी यानी व्यक्त केले.

      यावेळी शांतीलाल साळुंखे (गुरुजी), प्रविण तोडकर नितीन गानमोटे, सचिन स्वामी(मेजर), रुपेश भोसले, नवनाथ पवार, विजय कदम ,गणेश सोंगटे, योगेश सावंत उपस्थित होते.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here