आंसगी तुर्क तलावाचे पाणी पांडोझरीत दाखल

0
8



जत,संकेत टाइम्स : पांडोझरी ता.जत येथे तीव्र पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर आंसगी तुर्क तलावाच्या कँनॉलमधून पाणी सोडण्याची मागणी उपसंरपच नामदेव पुजारी यांनी आमदार विक्रमसिंह सावंत व जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांच्याकडे केली होती.अखेर आमदार सांवत व पाटील यांच्या प्रयत्नातून आंसगी तुर्क तलावातील पाणी पांडोझरी वडापात्रात दाखल झाले आहे.





आंसगी तुर्क तलावाच्या खालील ओढा पांडोझरी येथे येतो,सध्या पांडोझरीत पाणी टंचाई वाढली आहे. त्यामुळे उपसंरपच नामदेव पुजारी यांनी मोठ्या प्रमाणात पाणी असलेल्या आंसगी तुर्क तलावाच्या कँनॉलमधून ओढापात्रात पाणी सोडावे,यासाठी आमदार सांवत व जि.प.सदस्य सरदार पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता.अखेर या पाठपुराव्याला यश आले असून तलावातून सोडलेले पाणी पांडोझरीत दाखल झाले आहे.या पाण्यातून पांडोझरी लगतचे सर्व बंधारे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे पाणी टंचाईतून मुक्तता होणार आहे.कडकडीत कोरड्या पडलेल्या ओढापात्रात पाणी खळखळ्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी चंद्रकांत कांबळे,तुकाराम बिराजदार,हणमंत बिराजदार उपस्थित होते.

नामदेव पुजारी म्हणाले,ऐन उन्हाळ्यात आमदार सांवत व जि.प.सदस्य पाटील यांच्या प्रयत्नातून अखेर पांडोझरी ओढापात्रात पाणी दाखल झाले आहे.या पाण्यातून ओढापात्रातील सर्व बंधारे भरणार असल्याने कुपनलिका,विहिरीना फायदा होणार आहे. शेतीसह गावचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.




आंसगी तुर्क तलावाचे पाणी पांडोझरीत दाखल झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here