दुर्वा एजन्सीकडून कोविड सेंटरना फ्रुट ड्रिंकची मदत

0
6



जत,संकेत टाइम्स : आपल्या तालुक्यात

कोरोनाच्या साथीचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत.अशा कठीण परिस्थितीत रुग्णांना आधार देणे हे आपले कर्तव्य आहे. रुग्णांना सुद्धा वाटलं पाहिजे आपली कोणीतरी

काळजी घेतंय. यासाठी जत येथील दुर्वा आणि सचिन एजन्सी यांनी सलग 15 दिवस रूग्णांना फुट ड्रिंकची व्यवस्था करून एक चागला उपक्रम राबवला आहे, असे गौरवोद्गार आ.विक्रमसिंह सावंत यांनी काढले.






जत येथील भारती वस्तीगृह येथे दुर्वा एजन्सीचे दीपक पाटणकर व सचिन एजन्सीचे सचिन मोरे यांच्या हस्ते या फ्रुट ड्रिंकचे बॉक्स आ.सांवत यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली.






आमदार सावंत म्हणाले की,जत शहरात कोरोनाबाधित रुग्णांना कोविड रुग्णालयात उपचार केले जातात. सर्वच रुग्णांना सध्या फळे व इतर साहित्य खरेदी करणे अडचणीचे ठरत होते.मात्र यामुळे रुग्णांना यांचा फायदा होणार आहे.यावेळी युवराज निकम,नाना शिंदे,अतुल मोरे,निलेश बामणे,सलीम पाच्छापुरे,महेश गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.


जत येथील दुर्वा एंजन्सीकडून फ्रुट ड्रिंकचे वाटप करण्यात आले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here