जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात कोरोना रुग्णाचा वाढता आलेख गुरूवारी खाली आला.गुरूवारी 78 नवे रुग्ण आढळून आले आहेत.तब्बल 110 रूग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. दुर्देवाने तीघाचा कोरोनामुळे मुत्यू झाला आहे.100 वरची संख्या कमी झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
तालुक्यात गेल्या चार दिवसात कोरोनाचा विस्फोट झाला होता.दररोज 100 च्या वर रुग्ण आढळून येत असल्याने चिंता वाढली होती.शहरासह ग्रामीण भागालाही कोरोनाने विळखा घातला होता.डफळापूरमध्ये गुरूवारी कोरोनाचे एकही रुग्ण आढळून आला नाही.दरम्यान जत पश्चिम भागातील एकाही गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नसल्याने दिलासा मिळाला आहे.
गुरूवारचे रुग्ण असे,जत 16,उटगी 6,उमदी 5,मोरबगी 1, जालीहाळ बु 1, शेगाव 1,आंवढी 1,वाळेखिंडी 3,कोळगिरी 1,उमराणी 4,वळसंग 2, कुणीकोणूर 2,माडग्याळ 8, अंकलगी 2, अचकनहळ्ळी 1, सिंदुर 1, बिळुर 5,पाच्छापूर 1,हळ्ळी 1 जा.बोबलाद 1, गुगवाड 3, येळवी 2, दरिबडची 1,खोजानवाडी 3,आसंगी तुर्क 1, उंटवाडी 1, देवनाळ 1,करजगी 1,
रावळगुंडवाडी 1 सनमडी 1 असे 78 रुग्ण आढळून आले आहेत.तालुक्याची संख्या यानिमित्ताने 4089 झाली आहे. सध्या 1039 रुग्णावर उपचार सुरू आहेत. त्यापैंकी 867 रुग्ण होम आयसोलेशन मध्ये आहेत.विशेष म्हणजे जत तालुक्याच्या पश्चिम भाग सुरक्षित आहे.दुसरीकडे जत शहर व पुर्व भागातील अनेक गावात रुग्ण संख्या वाढली आहे.
त्या भागात खऱ्या अर्थाने कोविड सेंटरची तातडीने गरज आहे.
तालुक्यात प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. सुसज्ज असे ग्रामीण रुग्णालयात 40 बेडचे कोविड रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे.त्यामुळे पुर्व भागात चांगली सोय होणार आहे
दरम्यान जत पश्चिम भागातील डफळापूर येथे काही प्रमाणात रुग्ण आढळून आले होते.मात्र गेल्या चार दिवसापासून रुग्ण संख्या घटली आहे.तर जत पश्चिम भागातील 17 गावात गुरूवारी एकही रुग्ण आढळून आलेला नाही.
सांगली जिल्ह्यात 1308 नवे रुग्ण
सांगली : सांगली जिल्ह्यात गुरूवारी 1308 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात 36 जणाचा मुत्यू झाला आहे. तर 798 जण कोरोना मुक्त झाले आहेत.गेल्या चार दिवसापासून वाढत असलेली काही तालुक्यातील रुग्ण संख्या स्थिरावलेली दिसली.जिल्ह्यात गुरूवारी करण्यात आलेलंया 5160 जणांच्या तपासणीत 1308 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
जिल्ह्याची संख्या यामुळे 74 हजार 398 झाली असून सध्या 12 हजार 918 रुग्ण उपचाराखाली आहेत.तालुक्याची एकूण संख्या, आटपाडी 71,कडेगाव 172,खानापूर 163,पलूस 35,तासगाव 79,सांगली महापालिका 255,जत 76,कवटेमहांकाळ 97,मिरज 203,शिराळा 42,वाळवा 125 असे 1308 नवे रुग्ण आढळून आले आहेत. आटपाडी 3,कडेगाव 2,खानापूर 1,तासगाव 7,महापालिका 3,जत 5,कवटेमहांकाळ 1,मिरज 5,शिराळा 2,वाळवा 7 अशा 36 रुग्णाचा दुर्देवाने मुत्यू झाला आहे.












