जत,संकेत टाइम्स : उमराणी(ता.जत) येथील सरसेनापती प्रतापराव गुजर स्मारकाच्या सुशोभित कामाची जत तालुक्याचे आ.विक्रमसिंह सावंत यांनी पाहणी केली.त्यावेळी कामाबाबत उपस्थित ठेकेदारांना आ.सांवत यांनी सुचना केल्या.
तालुक्यातील ऐतिहासिक वारसा असलेले सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या कार्याला उजाळा देता येईल,अशा पध्दतीने येथे नवनिर्माण करण्यात येत आहे.यावेळी मल्लेश कत्ती,जत तालुका काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष सुजय शिंदे गावातील पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
उमराणीतील सरसेनापती प्रतापराव गुजर स्मारकांच्या कामाची आ.विक्रमसिंह सांवत यांनी पाहणी केली.






