बसवजंयती घरातूनच साजरी करावी ; एम जी काराजनगी सर

0
5



जत,संकेत टाइम्स : जत‌ तालुक्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढला आहे. दरवर्षीप्रमाणे अक्षयतृत्तीयेला येणारी बसव जयंती बांधवानी घराबाहेर न पड़ता घरातचं‌ साजरी करावी,असे आवाहन बसवधर्मपीठ कुडलसंगमचे राष्ट्रीय बसवदल खाजानवाडीचे अध्यक्ष एम जी काराजनगी सर यांनी केले आहे.






श्री.काराजनगी सर म्हणाले, शुक्रवारी ता.14 मे रोजी लिंगायत धर्म संस्थापक,जगद्ज्योती, धर्म संस्थापक महात्मा बसवण्णांची (बसवेश्वर)जयंती आहे.महान विचारसरणी अंगीकारलेल्या लिंगायत धर्म संस्थापक बसवण्णांना जगाने डोक्यावर घेतले.यावर्षी कोरोनामुळे बसवजंयती निमित्तचे‌ सर्व सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यामुळे बांधवानी घरातून बसवजंयती साजरी करावी.जेणे करून कोरोना नियमाचे कोठेही उल्लंघन होणार नाही यांची खबरदारी घ्यावी.

धार्मिक विधीवध‌ पुजा,अर्चा मोजक्या नागरिकांच्या उपस्थितीत कराव्यात असे आवाहन काराजनगी सर यांनी केले आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here