बालगाव,संकेत टाइम्स : बोर्गी येथील हातभट्टी दारू काढणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकत 600 लिटर रसायन नाश केले.उमदी पोलीसांनी बुधवारी पहाटे ही कारवाई केली आहे.याप्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहिती अशी की,बोर्गी येथे
शिऱ्याप्पा श्रीशैल कांबळे व सुनील भियाप्पा कांबळे(नाईक) हे गावठी हातभट्टी काढून विक्री करत असल्याची माहिती पोलीसांना खबऱ्याकडून मिळाली होती.त्या आधारे पोलीसांनी
बुधवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास छापा टाकला असता सुनील कांबळे(नाईक) यास ओळखून सुनील थांब असे हाक देत असताना झाडाझुडपाच्या आडोश्याचा फायदा घेत अगांतील शर्ट जागेवरच टाकून त्याच्या कब्जातील हातभट्टीची काढलेसी 20 लिटर दारू जागेवरच टाकून तो मोटारसायकल वरून पळून गेला आहे.
त्यानंतर बोर्गी नदीपात्राजवळ शिऱ्याप्पा श्रीशैल कांबळे यास ही ओळखून हाक देत असताना तोही पळून गेला आहे त्याच्या कब्जातील 600 लिटर कच्चे रसायन पोलीसानी नाश केले आहे.या सपोनि दत्तात्रय कोळेकर,पोलीस उपनिरीक्षक शिरीष शिंदे,पोलीस हवालदार नितीन पलुसकर,पोलीस नाईक श्रीशैल वळसंग यांनी कारवाई केली आहे.
बोर्गी ता.जत येथे हातभट्टीचे रसायन पोलीसांनी नाश केले.








