जत तालुक्यात बुधवारी कोरोनाचा प्रभाव किंचित उतरला,नवे‌ रुग्ण कमी

0
21



जत,संकेत टाइम्स ; जत तालुक्यातील कोरोना नवे रुग्ण संख्या बुधवारी द्विशतकाच्या खाली आली.बुधवारी तालुक्यातील 53 गावात 191 नवे रुग्ण आढळून आले आहेत.गेल्या आठवड्यापासून रुग्णाचा आकडा दररोज अडीशेच्या आसपास जात होता.तो बुधवारी खाली आला असून रुग्ण संख्या 191 पर्यत कमी तर तब्बल 119 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने दिलासा मिळाला आहे.






तालुक्यातील जत शहर,माडग्याळ, उमराणी,डफळापूर, मिरवाड,वज्रवाड,मुंचडीत बुधवारी रुग्ण संख्या वाढली आहे. जत शहर,माडग्याळ, बिळूर,डफळापूर कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहे. त्यामुळे तेथील चिंता वाढली असून आरोग्य विभागाकडून या गावात विशेष मोहिम राबवत गतवर्षीच्या धर्तीवर पुर्ण गावाचा‌ सर्व्हे करत नागरिकांची तपासणी करण्याची गरज आहे.बुधवारी तालुक्यातील एकूण बाधित संख्या 6666 हजारावर पोहचली असून बुधवारी एकाही रुग्णाचा मुत्यू झालेला नाही.सध्या‌ तालुक्यात 2142 रुग्ण उपचाराखाली आहेत,




त्यापैंकी 1961 रुग्ण होम आयसोलेशन मध्ये आहेत.जत 32,वाळेखिंडी 1, बिळूर 2,मेंढेगिरी 2, संख 4, उमदी 1, को बो 1, वळसंग 1,शेगाव 5,तिल्याळ 1,मुंचडी 6,माडग्याळ 10, जा.बोबलाद 1 उमराणी 8, सोन्याळ 2, खैराव 1, दरिकोणूर 2 बालगाव 2,रा.वाडी 4,डफळापूर 8, पांढरेवाडी 1, गुगवाड 2, कुलाळवाडी 2, तिकोडी 5, बेंळूखी 3,







व्हसपेठ 4, टोणेवाडी 2,भिवर्गी 1, कुंभारी 5, कोसारी 2, बनाळी 2, रेवनाळ 2,खोजानवाडी 6,शेडयाळ 1, कंठी 1 मोरबगी 1, उंटवाडी 4, बागेवाडी 2, सिंदुर 7, मिरवाड 13, कुणीकोणूर 1,गोधळेवाडी 2, दरिबउची 1,वज्रवाड 10, करेवाडी को.3, धुळकरवाडी 1,वायफळ 1,बोर्गी बु 2,प्रतापपुर 1, येलदरी 2, शिंगणापूर 5,करेवाडी ति.1, हळळी 1 असे बुधवारी एकूण 191 रुग्ण आढळून आले आहेत.




Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here