भिवर्गीत शंभर टक्के लॉकडाऊन

0
3



भिवर्गी,संकेत टाइम्स : भिवर्गी,(ता.जत)गावात लॉकडाऊनला ग्रामस्थ,व्यापाऱ्याकडून शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे.अत्यावश्यक सेवा वगळता गावातील सर्व दुकाने बंद आहेत. गावातील मुख्य रस्ता,बसस्थानक आदी परिसरांसह सर्वत्र शुकशुकाट,शांतता निर्माण झाली आहे.अधूनमधून एकादे-दुसरे मोटासायकल स्वार,चारचाकी वाहने जात असल्याचे दिसून येत होते.







गावात मुख्य ठिकाणी पोलीस पाटील,सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.गावातील नागरिक आणि दुकानदार यांनी जनता कर्प्यूला चांगला प्रतिसाद दिला आहे.नेहमी गजबणारे भिवर्गी गाव एकदम शांतता निर्माण झाली.निर्मनुष्य रस्ते, निरव शांतता यामुळे गतवर्षीच्या लॉकडाऊनची आठवण झाली.






यावेळी सरपंच मदगोंड सुसलाद म्हणाले की, गावात कोरोना रुग्ण आढळून आल्याने गाव पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ग्रामसुरक्षा सक्रीय करण्यात आले आहे.यापुढे परिस्थिति बिघडू नये यांची ग्रामस्थानी खबरदारी घ्यावी. 






उपसरपंच बसवराज चौगुले म्हणाले की,कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.नागरिकांनी नियमांचे पालन करून सतर्क राहणे गरजेचे आहे.कोरोनचे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य विभागासह सर्व शासकीय यंत्रणा मोठ्या संकटाचे सामना करत आहे.यामुळे नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे,असे आवाहन केले.


भिवर्गी ता.जत येथे कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here