जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. पोलीस,आरोग्य आणि महसूल यंत्रणा अलर्ट झाली आहे.लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जत, उमदी पोलिसांनी कर्नाटक सीमा रस्त्यावर माती, मुरूम,काटे टाकून रस्ते बंद केले आहेत.सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे.तालुक्याच्या उत्तरेला सोलापूर जिल्हा हद्द आणि दक्षिणेला बेळगाव जिल्हा हद्द लागते. पूर्वभागाला विजापूर जिल्ह्याची व दक्षिणेला बेळगाव जिल्ह्याची हद्द आहे. विजापूर, इंडी,अथणी तालुक्यांच्या सीमा लागून आहेत.
सुसलाद, अक्कळवाडी, कोणबगी, धुळकरवाडी, मुचंडी, कागनरी, उमदी, सिद्धनाथ, उमराणी, सोनलगी, रावळगुंडवाडी, गुलगुंजनाळ, जालिहाळ खुर्द, कोंतेवबोबलाद या गावापासून कर्नाटकाला जोडणारी सीमा आहेत.कर्नाटक सीमेला जोडणाऱ्या रस्त्यावर बंदोबस्त ठेवला आहे.टाकून बंद करण्यात आला आहे.येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाणार आहे. मास्क न वापरणाऱ्यांवर कार्यवाही केली जात आहे. सीमेवर पोलीस, होमगार्ड यांचा पहारा असणार आहे. जीवनावश्यक वस्तू, माल वाहतुकीला परवानगी आहे. सीमाभागातील कागनरी ते यत्नाळ, ढोकळेवाडी जालगिरीतांडा,धुळकरवाडी ते घोणसगी, जालीहाळ खुर्द ते ऐगनाळ, सिद्धनाथ ते कनमडी,कोंतेवबोबलाद ते विजापूर, उमराणी ते ककमरी हे रस्ते खोदून, माती, मुरुम,काटे टाकून बंद केले आहेत. तिकोंडी ते यत्नाळ, मुचंडी ते कनमडी,कोंतेवबोबलाद ते विजापूर, उमदी,चडचण, कोकणगाव या रस्त्यावर बॅरिकेटस लाऊन वाहतूक बंद करण्यात आली आहे.