राज्य शासन,केंद्रशासनाकडून अन्नसुरक्षा,अंत्योदय लार्भांना मोफत धान्य लाभ

0
5



जत,संकेत टाइम्स : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण राज्यात काही कालावधी करीता लॉकडाऊन घोषित केला असल्याने संचारबंदीच्या काळात जिवनावश्यक सेवाचा भाग म्हणून महाराष्ट्र शासनाकडील नियमीत स्वरुपातील स्वस्त दरातील धान्य हे रास्त भाव धान्य दुकानदारांमार्फत मोफत स्वरुपात देणेचे आदेश आहेत. त्यानुसार माहे मे 2021 करीता तालुकेतील अन्नसुरक्षा व अंत्योदय लाभार्थीना ऑनलाईन प्रणालीव्दारे पॉस मशिन वरुन ग्राहकांचा अंगठा रजिस्टर करुन मोफत धान्य वितरीत केले जाणार आहे. सदरचे धान्य हे नियमीत प्रमाणानुसारच प्रति माणसी गहु 3 व तांदुळ 2 असे एकूण 5 किलो अन्नसुरक्षा लाभार्थी यांना तर अंत्योदय लाभार्थी कार्डधारकांना नियमीत प्रमाणानुसार गहू 25 व तांदुळ 10 असे प्रति कार्डधारकास 35 किलो धान्य वितरण केले जाणार आहे.







याशिवाय केंद्र शासनाकडील पंतप्रधान गरीब कुटुंब कल्याण योजनेव्दारे मागिल वर्षी प्रमाणे या वर्षी माहे मे व माहे जून 2021 करीता अन्नसुरक्षा व अंत्योदय लाभार्थीना ऑनलाईन प्रणालीव्दारे पॉस मशिन वरुन ग्राहकांचा अंगठा रजिस्टर करुन प्रति मानसी गहु 3 किलो व तांदुळ 2 किलो असे एकूण 5 किलो मोफत धान्य वितरीत केले जाणार आहे. माहे मे व जुन 2021 करीता केंद्र शासनाचे पीएमजीकेवाय् पीयोजनेच्या मोफत लाभा व्यतिरिक्त महाराष्ट्र शासनाकडील नियमित स्वस्त दरातील धान्य माहे मे 2021 मध्ये मोफत तर माहे जून 2021 करीता नियमित स्वस्त दराने वितरीत केले जाणार आहे.








सदर योजनेचा लाभ जत तालुकेतील 177 दुकानदारांमार्फत वितरीत केला जात असून जे लाभार्थी अन्नसुरक्षा व अंत्योदय योजनेतील आहेत त्यांनाच सदरचा स्वस्त व मोफत धान्य लाभ वितरीत करणेत येणार आहे. तालूकेत एकूण अन्नसुरक्षा व अंत्योदय योजनेचे ऑनलाईन लाभार्थी (पॉस मशिन वर नोदं असलेले) प्राधान्य गट (अन्नसुरक्षा योजना) कार्डधारक 47117 असून त्यातील कार्ड सदस्य संख्या 222649 इतकी ऑनलाईन नोंद आहे. तर अंत्योदय योजना ऑनलाईन कार्डधारक (पॉस मशिन वर नोदं असलेले) 2961 असून त्यातील सदस्य संख्या 13866 इतकी आहे,यांना मोफत धान्य लाभ वितरण करणेत येणार आहे.तरी तालुक्यातील योजनापात्र लाभार्थी यांनी आपले गावातील रा.भा.दुकानदारांकडून इपॉस मशिन व्दारे शासन नियमानुसार मुदतीत धान्य प्राप्त करुन घ्यावे. 






या कामी कुणीही दुकानाजवळ गर्दी करु नये.सोशल डिस्टन्सींग नियमाचे पालन करावे. मास्कचा वापर करावा. काही तक्रार असलेस स्थानिक ग्रामदक्षता समिती यांचेकडे संपर्क साधावा, असे अवाहन जत तहसिलदार श्री सचिन पाटील यांनी पत्रकांव्दारे केले आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here