जत,संकेत टाइम्स : दरिबडची ता.जत येथे शेतातून ट्रँक्टर नेहले म्हणून चौघानी खूनी हल्ला करून ट्रँक्टर घेऊन जाणाऱ्या संख येथील चौघांवर खूनी हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी रात्री साडेआठच्या दरम्यान घडली आहे.
शितल बाळू ठोंबरे,भारत कोडिंबा ठोंबरे,बाळू कोंडिबा ठोंबरे,तानाजी भारत ठोंबरे अशी जखमीची नावे आहेत.
तर हल्लेखोर सागर गुलाब चव्हाण, गोरख मोहन राठोड,नवनाथ लालसिंग राठोड,व एक अनओळखी (सर्वजण रा.लमानतांडा, दरिबडची) यांच्यावर जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी, जखमी शितल ठोंबरे,व अन्य जखमीनी संशयित हल्लेखोरांच्या शेतातून टँक्टर नेहल्याच्या कारणावरून गोरख राठोड,नवनाथ राठोड,सागर चव्हाण व अनओळखी एकाने ट्रँक्टर थांबवून ठोंबरे याला तु आमचे रानातून ट्रँक्टर न्यायचा नाहीस,असे यापुर्वी सांगूनही ट्रँक्टर घेऊन चाललास आहेस म्हणत सागर चव्हाण यांने त्याचे हातातील चाकूने बाळू ठोंबरे
डोकीत,डावे पायावर,दंडावर वार केले.तसेच जखमीचा चुलत भाऊ तानाजी ठोंबरे याचे डोकित,तर चलते भारत ठोंबरे यांचे पोटाच्या पाठीमागील बाजूस गंभीर वार करत चाकू पोटात खूपसून खूनी हल्ला केला.त्याशिवाय अन्य तिघांनी काठीने मारहाण करण्यात आली.त्यात तिघांना गंभीर जखमी करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.
ट्रँक्टरच्या हेडलाईट फोडून,टायरमधील हवा सोडून देत टायर फोडून नुकसान केले आहे.म्हणून शितल ठोंबरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सागर गुलाब चव्हाण, गोरख मोहन चव्हाण,नवनाथ लालसिंग राठोड,व एक अनओळखी रा.लमानतांडा यांच्या विरोधात जत पोलीसांनी भादंविसं नुसार 307,326,324,323,427,34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
अधिक तपास सा.पो.नि.महेश मोहिते,उप निरिक्षक घोडके करत आहेत.दरम्यान ही घटना वाळू तस्करीच्या संघर्षातून झाल्याची चर्चा घटनास्थळावर सुरु होती.मात्र पोलीसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात तसा उल्लेख केलेला नाही.त्यामुळे संशय व्यक्त होत आहे.