निर्बंधात‌ अवैध धंदे जोमात | वरकमाईने पोलीसांचा पांठिबा ; 4 वसूली कलेक्टर नेमले ?

0
3



जत,संकेत टाइम्स : राज्य सरकारच्या निर्बंधानंतर शहरासह ग्रामीण भागातील अनेक दुकाने बंद ठेवण्यात येत आहेत.मात्र दुसरीकडे जत ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर मटका, जुगार सुरू असून, हॉटेल-ढाब्यांसह अनेक ठिकाणी देशी-विदेशी व हातभट्टी दारूची विक्री विनापरवाना राजरोसपणे सुरू आहे. याबाबत जत पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही पोलीस ठाण्यातील अधिकार्‍यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. यामुळे अवैध धंद्यात दिवसेंदिवस वाढ होत असून, नागरिक पोलीस व त्यांच्या अधिकार्‍यांच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.






जत‌ ठाण्याचे चार वसूली कलेक्टर सर्वकाही मँनेज करत असल्याने बसल्या ठिकाणी मिळकत होत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्याकडून त्यांना अभय मिळत असल्याची चर्चा आहे.परिणामी अवैध धंदेवाले पोलिसाच्या आर्शिवादाने सुसाट आहेत.सध्या‌ जत शहरासह तालुक्यातील प्रमुख गावात दुकाने बंद करण्यासह गर्दी,सोशल डिस्टसिंग,लग्न,सामाजिक कार्यक्रम बंद करण्यात आले आहेत. एकीकडे जमाव बंद असताना तीन पानी जूगार अड्ड्यावर गर्दी ओसांडून वाहत‌ आहे.







ठाण्याच्या हद्दीतील अनेक गावात शाळा परिसर,सार्वजनिक ठिकाणी दारू गुप्ते,मटकाची दुकाने थाटली असून यामुळे बालमनावर वाईट परिणाम होत आहे.उमदी पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या शेगाव,येळवी,डफळापूर, बिळूर,गुगवाड,उमराणी,मुंचडी,जत या गावांमध्ये अवैध धंदे फोफावले आहेत. अनेक वर्षांपासून गावातील अनेक गल्लोगल्ली मटका-जुगाराचे अड्डे सुरू असून, त्यात सहा महिन्यांपासून वाढ झाली आहे.परिसरातील ग्रामीण भागात हातभट्टीची दारू आणून विकली जाते. दिवसेंदिवस सदरच्या अवैध धंद्यात वाढ झाली असून, नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.मात्र, पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे नागरिक बोलत आहेत.






अनेक गावात मोठया प्रमाणात जुगाराचे अड्डे असून, देशी-विदेशी व हातभट्टीची विक्री केली जाते.त्यामुळे अनेक गावातील तरुण व्यसनाच्या मार्गी लागल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. 

गावागावात भांडण-तंटे वाढत आहेत.शिवाय, ही दारू (डुप्लीकेट) दूषित व खराब असल्याने दारू पिणार्‍यांची नशा दिवसभर उतरत नाही.अनेकजण दारू प्यायल्याने दिवसभर रस्त्यात पडून असतात.तर काहीजण मरण पावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. 






पोलिसांच्या दुर्लक्षामुळे या धंद्यांना अभय मिळत असल्याचेही बोलले जाते.दरम्यान एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सरकारने निर्बंध घातले आहेत.त्याकडे जत‌ पोलीस जाणिवपुर्वक दुर्लक्ष करत आहेत.मात्र अवैध धंदे चालकांना या पोलीसाकडून वरदान दिले जात आहे.त्या बदल्यात वसूली कलेक्टरच्या हातावर वजन ठेवावे लागत‌ आहे.या अवैध धंद्याचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला असून जत‌ ठाण्याने 4 वसूली कलेक्टर नेमल्याची चर्चा आहे.


Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here