जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनो रुग्णांची संख्या वाढत असल्याने जनजागृती करण्यासाठी शहरातील प्रत्येक नगरसेवकांनी आपआपल्या वार्डात फिरून जनजागृती करावी तर तालुक्यातील प्रत्येक गांवातील सरपंच व उपसरपंच यांनी गावात जनजागृती करणे आवश्यक आहे.
प्रशासनाने दक्ष रहावे,असे आवाहन आमदार विक्रमसिंह सांवत यांनी केले.जत तालुक्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर आ.सांवत यांनी तहसीलदार कार्यालयात बैठक घेतली.यावेळी प्रांताधिकारी प्रंशात आवटे,तहसीलदार सचिन पाटील,
पोलीस निरिक्षक उत्तम जाधव,सा.पो.नि.श्री.भोसले,
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बंडगर,बाजार समिचीचे सहायक सचिव सोमलिंग चौधरी,पंचायत समिती,नगरपरिषदचे अधिकारी उपस्थित होते.
आ.सांवत यांनी आढावा घेतला.कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जनजागृतीचे काम करणे आवश्यक असुन यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी व मुख्याधिकारी यांनी तसे आदेशच काढावे अशा सुचना आमदार सांवत यांनी तहसीलदार कार्यालयातील आढावा बैठकीत दिल्या. तसेच आज पर्यंत कोरोना वाढू नये यासाठी तालुक्यातील अधिकारी यांनी काय उपाय योजना केल्या माहीती आमदार सांवत यांनी जाणुन घेतल्या.जतच्या अधिकाऱ्यांनी पहिल्या कोरोना लाटेत प्रभावी काम केले आहे. त्यांच्यावर पुन्हा नवी जबाबदारी आली आहे.सर्वानी दक्ष राहून नवी लाट थोपविण्यासाठी प्रयत्न करावेत असेही आ.सांवत यांनी आवाहन केले.
जत येथील बैठकीत बोलताना आमदार विक्रमसिंह सांवत








