जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावा,अशी मागणीअखिल भारतीय शिक्षक महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.तसे निवेदन गटशिक्षण अधिकारी यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,प्राथमिक शिक्षकांचे सेवा पुस्तके अद्यावत करून केंद्रनिहाय कॅम्प घ्यावेत.
मासिक पगार व प्रलंबित बिले तात्काळ अदा करण्यात यावीत.वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रस्ताव केंद्रनिहाय आढावा घेऊन 31 मार्च अखेर प्राप्त शिक्षकांची प्रस्ताव घेऊन निवड श्रेणी साठी प्रशिक्षणाची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून द्यावी,जिल्हा स्तरावरून प्राप्त अनुदानानुसार प्राथमिक शिक्षकांची बरेच वर्ष न मिळालेली फरक बिले तात्काळ अदा करण्यात यावीत.प्राथमिक शाळेतील न्यायालयीत प्रकरणाची तड लावण्यासाठी व शाळांवरील अन्याय दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने शाळांची बाजू मांडण्यासाठी वकिलाची नेमणूक करण्यात यावी.
जत तालुक्यातील जवळजवळ अडीचशे-तीनशे प्राथमिक शिक्षकांचे इन्कम टॅक्स रक्कम खात्यावरती जमा दिसत नसून यामध्ये तालुका प्रशासनाच्यावतीने गांभीर्याने लक्ष घालून ज्या त्या शिक्षकांच्या पॅन खात्यावरती रकमा आढावा घेऊन तात्काळ जमा करण्यात याव्यात.
जत तालुक्यातील शिक्षकांचे प्रश्न सोडवावेत,अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.








