माडग्याळ, संकेत टाइम्स : नव्या योजनामुळे जिल्हा परिषद शाळा नव्या विद्यार्थ्यांना आदर्श व सर्वगुण संपन्न बनवतील,असे प्रतिपादन शिक्षण सभापती आशा पाटील यांनी केले. कुलाळवाडी ता.जत येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत राजमाता आहिल्यादेवी होळकर सायन्स पार्कचे उद्घाटन सौ.आशा पाटील यांच्याहस्ते झाले.त्यावेळी सौ.पाटील बोलत होत्या.
माजी सभापती तम्मणगौडा रविपाटील,शिक्षण अधिकारी विष्णू कांबळे, कवठेमहांकाळ पंचायत समिती सदस्या सौ.सोनाली लोंढे, सरपंच,सदस्य,शिक्षक उपस्थितीत होते.
याप्रसंगी सर्व मान्यवरांचे विद्यार्थ्यांनी बनवलेले सीड बॉल्स देऊन अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. शाळा आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने गावात सुरू असलेल्या जलसंधारण, वृक्षसंवर्धन तसेच इतर समाजोपयोगी उपक्रमांबद्दल अभिनंदन केल्या.
वृक्षारोपण करून तसेच यापूर्वी लावलेल्या झाडांना मल्चिंग व जीवामृत देऊन कुलाळवाडीतील राजमाता अहिल्यादेवी होळकर वनराई या वृक्ष संवर्धनाच्या उपक्रमात सहभाग नोंदवला. मोठ्या प्रमाणावर केलेल्या वृक्ष संवर्धनाच्या सातत्यपूर्ण कार्याबद्दल विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. अतुल राऊत यांच्या कल्पक कार्याची दखल घेत त्यांचे कौतुक केले.
कुलाळवाडी ता.जत येथील राजमाता आहिल्यादेवी होळकर सायन्स पार्कचे उद्घाटन केले.








