माडग्याळ, संकेत टाइम्स : सर्व पक्षाच्या नेत्यांना बरोबर घेऊन जत तालुक्यातील वंचित गावांना सिंचन योजना राबविण्यासाठी पाठपुरावा करू,असे प्रतिपादन खा.संजयकाका पाटील यांनी केले.
आंसगी (जत) ता.जत येथील ग्रामपंचायत इमारतीच्या उद्घाटन प्रंसगी खा.पाटील बोलत होते.
यावेळी आमदार विक्रमसिंह सांवत,माजी सभापती प्रकाश जमदाडे, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
खा.पाटील पुढे म्हणाले,
गत पाच वर्षात केंद्राच्या योजनेतून दोन हजार कोटीवर निधी आणून जत तालुक्यातील म्हैसाळ योजनेची कामे केली आहेत.ती पुर्णत्वाकडे आहेत.
त्यामुळे मोठ्या क्षेत्रात पाणी येणार आहे.तालुक्यातील जनतेने मला जातीपातीच्या राजकारणाला फाटा देऊन मला मताधिक्य दिले आहे. मतदारांनी दाखविलेल्या विश्वास सार्थकी लावण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील सिंचनापासून वंचित गावांना म्हैसाळ,असो किंवा तुबची-बबलेश्वर किंवा अन्य योजना राबवून पाणी पोहचवू,त्यासाठी आ.विक्रमसिंह सांवत,माजी आमदार विलासराव जगताप यांना एकत्र घेत शासनाकडे प्रयत्न करू,आ.सांवत राज्य व मी केंद्र शासनाकडून निधी आणण्यासाठी पाठपुरावा करू,जतच्या विकासासाठी एकत्रित काम करू असेही खा.पाटील म्हणाले.
आ.विक्रमसिंह सांवत, तालुक्यात आणलेल्या योजनाचे श्रेय घेण्याचा मोठा प्रकार सुरू आहे.या श्रेय वादामुळे म्हैसाळ योजनेत समावेश होऊ शकणारी आंसगीसह आसपासची आठ गावे समाविष्ट होऊ शकली नाहीत.त्यांचा फटका या गावांना बसत आहे. विकासासाठी आम्ही कायम दोन हात पुढे राहू,जत तालुक्यात सर्वाधिक मोठा प्रश्न शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे.म्हैसाळ योजनेच्या बधिंस्त पाईपलाईन मुळे पाणी मोठ्या क्षेत्रात येऊ शकते.
म्हैसाळ योजना,कर्नाटकातील तुबची-बबलेश्वर योजनेतून
आम्हाला आमची तलावे भरून द्यावीत,आमच्या भागाचा विकास करण्यासाठी आम्हची पाणी ही मागणी आहे.पाणी आणण्यासाठी कोणाला पाहिजे त्यांनी श्रेय घ्यावे,मात्र पाणीसह जतच्या विकासासाठी एकत्रित लढू असे सांवत म्हणाले.
सरदार पाटील म्हणाले,तालुक्यातील अत्याधुनिक व सुसज्ज ग्रामपंचायतीची इमारत आंसगी जत येथे उभारण्यात आली आहे. या इमारतीसाठी गावातील नेत्यांनी गटतट,पक्ष विसरून मदत केली आहे.
आंसगी जत,ता.जत येथील ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण करताना खा.संजयकाका पाटील,आ.विक्रमसिंह सांवत










