वाळू तस्करी करणारा डंपर पकडला

0
5



जत,संकेत टाइम्स : जत शहरात बेकायदा वाळू वाहतूक करत असलेला डंपर तहसीलदार सचिन पाटील यांनी पकडला.जत तालुक्यातील सिंगनहळ्ळी, बागलवाडी,वाळेखिंडी परिसरातून बेकायदा वाळू तस्करी वाढली होती.त्या पार्श्वभूमीवर तहसीलदार सचिन पाटील यांनी शनिवारी रात्री गस्त सुरू केली होती.






जत शहरालगत सैनिक नगर नजिक सिंगनहळ्ळी हून वाळू भरलेला एक डंपर येत असल्याची माहिती पाटील यांच्या पथकाला माहिती मिळाली होती.पाटील यांच्या पथकाने सापळा लावून डंपर पकडत पोलीसांच्या ताब्यात दिला.डंपरमध्ये चार ब्रास वाळू होती.डंपरला सुमारे चार लाख दंड प्रस्तावित केला आहे.







कारवाईत मंडल अधिकारी भुकटे,तलाठी वाल कोळी यांनी सहभाग घेतला. दरम्यान या कारवाईची शनिवारी दिवसभर जोरदार चर्चा सुरू होती.



जत महसूल विभागाने पकडलेला डंपर

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here