जत ‌पंचायतीत‌ विज वितरण कंपनीचे अधिकारी धारेवर | मासिक सभा संपन्न

0
3



जत,संकेत टाइम्स : सध्या कोरोनाचा प्रभाव यामुळे नागरिक अडचणीत आहेत.शेकडो शेतकऱ्यांचे कृषी पंप बंद असतानाही विज बिले आली आहेत.त्यांचा स्पॉट पंचनामा करून बिले निश्चित करावीत,घरगूती ग्राहकांची बिलाचे हप्ते करून द्यावी,बिल आले‌नाही म्हणून विज कनेक्शन तोडायचे नाहीत,असा सज्जड दम सभापती मनोज जगताप व पंचायत समिती सदस्यांनी विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला.







जत पंचायत समितीची मासिक सभा सभापती जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

विज कनेक्शन तोडण्यावर दिग्विजय चव्हाण व सदस्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले,कोणावर अन्याय न करता विज बिले वसूली करावी,असा ठराव घेण्यात आला.






अँड.आडव्याप्पा घेरडे यांनी अनेक वेळा एसटी‌ महामंडळाच्या‌ अधिकाऱ्यांना पत्रे देऊनही बस सुरू केली जात नाही,याबाबत जाब विचारल्या,बस‌ तात्काळ सुरू करावी,असा ठराव घेण्यात आला.







जत‌ पुरवठा विभागाच्या‌ कामकाजावरही सदस्यांनी अक्षेप घेत,रखडलेली रेशनकार्ड तातडीने वाटावीत अशा सुचना केल्या. त्याशिवाय संख तलावाच्या कालव्यातून पाणी सोडण्याचा विषय दिग्विजय चव्हाण यांनी सभेत मांडला पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी कालव्या 10 किलोमीटर व्यवस्थित आहे,त्यापुढे कालव्यातून पाणी सोडणे शक्य नसल्याचे सांगितले.






तलावात सध्या 88 टक्के पाणी साठा उपलब्ध आहे.दहा किलोमीटर पर्यत पाणी सोडू असे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.

रामाण्णा जिवाण्णावर,रविद्र सांवत,आप्पा मासाळ,सौ.मंगलताई जमदाडे,सौ.सुशिला तावशी आदि सदस्य उपस्थित होते.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here