जत,संकेेेत टाइम्स : केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी दिल्लीत पंजाब, हरियाणा, राजस्थानसह देशातील अनेक राज्यांतील शेतकरी आंदोलन करत आहेत. आंदोलनकांचे म्हणणे केंद्र सरकार ऐकून घेत नाही. त्यामुळे आज शेतकरी संघटनांकडून भारत बंदची हाक देण्यात आली आहे,
त्याला पाठिंबा देण्यासाठी जतेत कॉग्रेसचे आमदार विक्रमसिंह सांवत यांच्या नेतृत्वाखाली बाजार समिती लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवरील आंदोलक शेतकरी संघटनांकडून भारत बंद पुकारण्यात आला आहे.
आमदार सांवत म्हणाले,केंद्राचे काळे कायदे शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे आहेत.त्यामुळे दिल्लीच्या सिमेवर शेतकरी आंदोलनास बसले आहेत.त्यांच्या आंदोलनाची दखलही केंद्र शासन घेत नाही,ही दुर्देव्य आहे.यापुढे शेतकऱ्यांच्या आंदोलनात जत तालुक्यातील शेतकरी सहभागी असतील.यावेळी माजी सभापती बाबासाहेब कोडग, तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार,नगरसेवक भूपेंद्र कांबळे,निलेश बामणे व कॉग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
जत येथे कॉग्रेसकडून शेतकरी आंदोलनाला पांठिबा देण्यासाठी लाक्षणित उपोषण करण्यात आले.








