माडग्याळ, संकेत टाइम्स : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील दोन आठवडे आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिलेले असतानाही माडग्याळ ता.जत येथील जनावरांचा बाजार भरविण्यात आला होता.यांची माहिती उमदी पोलीसांना मिळताच त्यांनी बाजारातील शेतकरी,व्यापाऱ्यांना हटवत बाजार थांबविला.
दरम्यान अचानक पोलीसाकडून कारवाई सुरू झालेल्याने शेतकरी,व्यापारी सैरावैरा झाल्याने काही जनावरे,मोबाइल, रोखड चोरी झाल्याचे वृत्त आहे.
माडग्याळ ग्रामपंचायती कडून आठवडा बाजार रद्द करण्यात आल्याची सुचना गुरूवारी ध्वनीपेक्षावरून नागरिकांना देऊनही काही व्यापारी आल्याने भाजीपालाचा बाजारही भरविण्यात आला होता. त्यात कहर म्हणून महाराष्ट्र कर्नाटकातील प्रसिद्ध असणारा जनावरांचा बाजार भरविण्यात आला,सुमारे 2 हजार शेतकरी,व्यापारी एकत्र जमल्याने कोरोना नियमाचा फज्जा उडाला होता.
सोशल डिस्टसिंग ,मास्क वापरण्यात आले नव्हते.दरम्यान सकाळी खरेतर ग्रामसेवक,तलाठी,संरपच यांनी बाजार भरण्या अगोदर शेतकऱ्यांना सुचना देण्याची गरज होती. मात्र बाजार हटविण्या पर्यत तलाठी,ग्रामसेवक उपस्थित नव्हते.दुसरीकडे बाजार समितीकडून पास देऊन हलगर्जीपणा झाला.परिणामी प्रचंड गर्दीची माहिती उमदी पोलीसांना मिळताच सा.पो.नि.नामदेव दांडगे यांच्या टिमने शेतकऱ्यांना हुसकाऊन लावत बाजार हटविला.मात्र या कारवाईत एकदम गोधळ उडाल्याने पळापळी झाली,बाजार रद्द झाल्याची माहिती नसल्याने लांबवरून आलेल्या शेतकऱ्यांचे हाल झाले.
व्यापाऱ्याचेही मोठे नुकसान झाले.बाजार रद्द झाल्याने दोन कोटीवर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. त्याशिवाय गोधळ उडाल्याने काही शेतकऱ्यांचे जनावरे,मोबाइल, रोखड चोरीला गेल्याचा प्रकार झाला आहे. दरम्यान पोलिसांनी अचानक लाठीचार्ज केल्यांने पळापळ झाली व गोधळ उडाल्याचे काही शेतकरी,व व्यापाऱ्यांनी सांगितले.
बाजार बंद केल्याची सुचना नसल्याने आम्ही लांबवरून आलो,पासही मिळाल्याने खरेदी सुरू केली होती,मात्र अचानक पोलीसांनी कारवाई केल्याने काही विकत घेतलेली जनावरे गायब झाल्याचे काही व्यापाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान नियमाचा फज्जा उडाल्याने कोणावर कारवाई करायची,असा काहीसा प्रश्न तालुका प्रशासनासमोर पडला आहे.









