निविदा उघडण्यापूर्वीच खडीकरणाचे काम पूर्ण | गुडडेवरांच्या कारवाईकडे लक्ष

0
29



जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील मौजे कोसारी येथे अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण कामाची निविदा उघडण्यापूर्वीच खड्डीकरण्याचे काम पूर्ण करण्यात आल्या प्रकार समोर आला आहे,या कामाची चौकशी करण्याची मागणी युवा कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुड्डेवार यांच्याकडे केली आहे.







कोसारी येथील अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करण्याची नोटीस पहिल्यांदा मजूर सोसायटीला मंजूर करण्यात आली. सदर काम मजूर सोसायटीचे रद्द करून दुसऱ्यांदा काम खुल्या वर्गासाठी निवडण्यात आले. कामाची ई-निविदा 13 मार्च 2021 ते 19 मार्च 2021 रोजी पर्यंत निविदा भरण्यासाठी खुली करण्यात आली होती. 24 मार्च अखेर निविदा उघण्यात आल्या नव्हत्या. 







कार्यारंभ आदेश निघालेला नव्हता.मात्र सर्व प्रक्रिया होण्या अगोदरचं संबंधित रस्त्याचे खडीकरण काम पूर्ण करण्यात आले आहे.त्यामुळे कामाची गुणवत्ता आणि दर्जा याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होतो.त्याशिवाय निविदा प्रक्रिया कागदपत्री राबवून पदाधिकारीच ठेकेदार बनून दर्जाहिन कामे करून निधीवर डल्ला मारत असल्याचा प्रकार या प्रकरणाने समोर आला आहे.या संपूर्ण कामाची सखोल चौकशी करावी आणि संबंधितांवर योग्य कारवाई करावी. 







त्याशिवाय या कामाची बिले अदा करण्यात येऊ नयेत,अशी मागणी युवा कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी केली आहे.



कोसारी येथील निविदा उघडण्यापूर्वीच खडीकरणाचे काम पूर्ण झालेला रस्ता

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here