हिवरे,संकेत टाइम्स : म्हैसाळ सिंचन योजनेच्या कालव्यातून अखेर जत तालुक्यात मंगळवारी सकाळी पाणी दाखल झाले.यावर्षी प्रथमच कृष्णामाई जत तालुक्यात अवतरली आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून म्हैसाळ योजनेचे पंप सुरू करण्यात आले आहेत.
मिरज,कवटेमहांकाळ,तासगाव,मार्गे जत तालुक्यात पाणी दाखल झाले आहेत.गेल्या काही दिवसात तालुक्यात उन्हाचा तडाका जाणवू लागल्याने पिके माना टाकत होती.मात्र म्हैसाळ सिंचन योजनेतून आलेल्या या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून पाणी पोहचणाऱ्या सर्व भागातील तलावे,बंधारे,नालाबांध भरून द्यावेत,अशी मागणी होत आहे.
दरम्यान तालुक्यातील मुख्य कँनॉल,बिळूर,देवनाळ पोट कालव्यातून पाणी सोडण्याचे नियोजन अधिकारी करत आहेत.
दरम्यान तालुक्यात मुख्य कँनॉलपासून सुरू होणाऱ्या अनेक बधिस्त पाईपलाईन उपयोजनाची कामे पूर्णत:कड़े आली आहेत.या योजनातूही पाणी सोडण्यात यावे अशी मागणी आहे.या योजनाच्या माध्यमातून लाभक्षेत्रातील मोठ्या प्रमाणात जमिनी ओलिताखाली येणार आहेत.
जत तालुक्यातील हिवरे येथे म्हैसाळ सिंचन योजनेचे पाणी दाखल झाले आहे.








