जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील कासलिंगवाडीत कोरोनाचा कहर कायम असून मंगळवारी पुन्हा नवे 8 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.दुसरीकडे तालुक्यात कोरोनाचे मंगळवारी नवे 23 रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे.
दरम्यान कोरोनामुळे जिल्ह्यात सर्व कार्यक्रमांना बंदी असतानाही कासलिंगवाडीत लग्न सोहळा आयोजित केल्याने गावात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. तसाच कार्यक्रम सोमवारी मोठ्या संख्येने महिलांना एकत्र करत पश्चिम भागातील एका गावातील ग्रामपंचायतीत विना परवाना घेण्यात आला होता.नेमके शासनाचे आदेश ग्रामपंचायतीना लागू आहेत की नाहीत,असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
दरम्यान जत तालुक्यात कोरोना प्रभाव दिवसेन् दिवस झपाट्याने वाढत आहे.नागरिकांचा बेफिकीरपणा पुन्हा नव्या संकटाकडे नेहत आहे.जत तालुक्यातील कासलिंगवाडी जिल्ह्यात हॉटस्पॉट ठरले असून आजपर्यत 50 रुग्ण आढळून आले आहेत. गावाच्या सिमा बंद करण्यात आल्या असून प्रवेश निषिद्ध करण्यात आला आहे.
पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
चार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाकडून दररोज नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे.
मंगळवारी जत शहर 11,खिलारवाडी 1,कुंभारी 1,शेगाव 1,कासलिंगवाडी 8,बागलवाडी 1 येथे नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.









