माडग्याळ,संकेत टाइम्स : माडग्याळ येथील कोरे वस्ती येथे राहणाऱ्या शिवानंद सिद्राम कोरे यांच्या घरी दिवसाढवळ्या धाडसी चोरीची घटना घडली आहे.यात सुमारे सात लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे.कोरे देवीचे पुजारी असल्याने देवीचे सोने त्यांच्या घरी होते.
याबाबत उमदी पोलीसात नोंद झाली होती,मात्र 4 मार्चला चोरी होऊनही तब्बल 18 दिवसाचा कालावधी उलटला तरीही चोरीचा छडा लागला नसल्याने संबधित कोरे यांनी ता.22 रोजी उपोषणाचा इशारा दिला होता.
दरम्यान उमदी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी कोरे यांची भेट घेतली.आम्हाला काही दिवस वेळ द्यावा, चोरट्याच्या मुसक्या आवळू असे आश्वासन दिल्याने कोरे यांनी तात्पुर्ते उपोषण मागे घेतले आहे. मात्र चोरट्याचा तपास न लागल्यास पुन्हा बेमुदत उपोषण करू,असा इशारा त्यांनी दिला आहे.








