कासलिंगवाडी कोरोनाचे हॉटस्पॉट | आतापर्यत 42 रुग्ण | जतेतही रुग्ण संख्या वाढली

0
3



जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात कोरोनाचा विस्फोट झाला असून सोमवारी एकाच‌ दिवशी तालुक्यात नवे 25 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे







तालुक्यातील कासलिंगवाडी कोरोनाचे हॉटस्पाट ठरले आहे.कासलिंगवाडीत एका लग्न कार्यासाठी एकत्र आलेल्या नागरिकांपैंकी आतापर्यत 42 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.त्यामुळे चिंता वाढली असून आरोग्य विभागाचे सर्व लक्ष आता कासलिंवाडीकडे वेधले आहे.लग्न कार्यात एकत्र येणें येथील नागरिकांना चांगलेच महागात पडल्याचे चित्र आहे. प्राथमिक गावभाग व संबधित नातेवाईकांच्या वस्तीवरील जवळपास सर्वच नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. त्यापैंकी सोमवारी पुन्हा 14 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.






त्याशिवाय जत शहर 5,बिळूर‌‌2,धावडवाडी 1येथे नवे रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यातील ‌चिंता‌ यामुळे वाढली आहे.

कासलिंगवाडीत पहिला रुग्ण 15 मार्चलला आढळून आला होता.त्यानंतर करण्यात आलेल्या तपसणीत 16 मार्चलला 6 रुग्ण,19 मार्चलला 20 रग्ण,20 मार्चलला 1रुग्ण,आज‌‌सोमवार 22 मार्चला 14 असे एकूण 42 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. 






गावात महसूल व आरोग्य विभागाकडून खबरदारी घेण्यात ‌येत आहे.दरम्यान जत शहरातील रुग्ण संख्या हळूहळू वाढत ‌आहे.तालुक्यातील कोरोना बाधित संख्या यामुळे 2178 वर पोहचली आहे.सध्या 88 जण उपचारा खाली आहेत.त्यातील 76 जण होम आयसोलेशन मध्ये आहेत.2015 रुग्ण आतापर्यत‌ कोरोना मुक्त झाले आहेत.

दरम्यान नागरिकांनी मास्क,सोशल डिस्टसिंग, सँनिटायझरचा वापर करावा,कुंटुबियासह स्व:ताचीही काळजी घ्यावी,असे आवाहन तहसीलदार सचिन पाटील यांनी केले आहे.



Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here