शेगावचा आठवडा बाजार बंद

0
8



शेगाव,संकेत टाइम्स : शेगावसह कासलिंगवाडी,बागलवाडी,वाळेखिंडी परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने शेगावचा सोमवारचा आठवडा बाजार अखेर ग्रामपंचायतीने बंद केला आहे.

शेगावचा मोठा आठवडा बाजार भरतो,येथे परिसरातील गावे,व वाड्या वस्त्यावरील शेकडो नागरिक येतात.





शेगाव लगतचे कासलिंगवाडी गाव कोरोनाचे हॉटस्पाट बनले आहे.त्याशिवाय अन्य गावातही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत.आठवडा बाजारामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू नये,यासाठी सोमवार ता.22 पासून पुढील काही आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला आहे.






शेगावमधील नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, नागरिकांनी मास्क,सोशल डिस्टसिंग,सँनिटाइझरचा वापर करत कुंटुबियासह स्व:ताची काळजी घेण्याचे आवाहन ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे.



Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here