तिकोंडीत‌ गँसचा स्फोट,7 लाखाचे नुकसान | पंधरवड्यात चार घटना

0
4





तिकोंडी,संकेत टाइम्स : 

जत तालुक्यातील तिंकोडी येथील कुमार बसाप्पा चौधरी यांच्या राहत्या घरास आग लागून सुमारे 7 लाखाचे नुकसान झाले.

तिकोंडी गावाजवळ असणाऱ्या हादमनी वस्तीजवळ चौधरी कुंटुबिय राहतात.सकाळी त्यांच्या पत्नी स्वयंपाक करत असताना काही कामा निमित्त घराबाहेर गेल्या नंतर‌ अचानक गँसचा स्फोट झाला.







त्यामुळे घराला लागलेल्या आगीत घर जळून खाक झाले.घरामध्ये असलेले 50 हजार रोख‌ रक्कम,सोने-चांदीचे दागिणे,धान्याची पोती,शेती साहित्य,संसार उपयोगी साहित्य,घराचे मोठे नुकसान झाले आहे.सुदैवाने सर्वजण घराबाहेर असल्याने जीवीत‌ हानी टळली.चौधरी कुंटुबियावर यामुळे मोठे संकट कोसळले,असून त्यांना शासन, दानसूर लोकांनी मदत करावी असे,आवाहन करण्यात आले.







दरम्यान जत तालुक्यात स्फोट,व अन्य कारणामुळे घरांना आग लागण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. गेल्या पंधरवड्यात चार ठिकाणी झालेल्या दुर्घटनेत चार कुंटुबे उघड्यावर आली आहेत.नागरिकांनी छप्पर,पञ्याची‌ घरांची काळजी घेण्याची गरज आहे. गँस वापरण्या बाबतही महिलांनी खबरदारी घ्यावी,यासाठी सामाजिक संघटना,पक्षानी शिबिरे घेऊन महिलांच्यात जागृत्ती करावी,अशी स्थिती नुकत्याच झालेल्या

घटनेवरून अधोरेखित झाली आहे. 





तिकोंडी ता.जत येथे गँसचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत घर जळून खाक झाले आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here