जत,संकेत टाइम्स : लहरी निसर्ग,कोरोनामुळे जत तालुक्यातील शेतकरी,सामान्य नागरिक अडचणीत आहेत.तरीही महावितरण कडून सक्तीने बिल वसूली सुरू आहे,त्याला स्थगिती देऊन विज माफ करावी,या मागणीसाठी स्वा.शेतकरी संघटनेच्या वतीने जत येथील महाराणा प्रताप चौकात रास्ता रोको आंदोलन केले.
शासनाचे सातत्याने विज बाबतचे बदलते धोरण,नागरिका समोरील कोरोनाचे संकट यात खरेतर वीज बिल माफ करण्याची गरज असताना महावितरणकडून बिले न भरणाऱ्या ग्राहकांची कनेक्शन तोडण्यात येत आहे,ते थांबवावेत अशी मागणी करण्यात आली.
तहसिलदार सचिन पाटील व महावितरणचे अभियंता श्री.सुतार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष रमेश माळी, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड.सुरेश घागरे,पक्षाचे तालकाध्यक्ष दुंडप्पा बिराजदार,सुधीर माळी, आबा गावडे, हरिबा गडदे,बसू दोडमल,शिद्धू येलमळी यांच्यासह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
जत येथे स्वा.शेतकरी संघटनेने रास्ता रोको आंदोलन केले.








