सांगली : कर्नाटक शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र राज्यातून विजापूर जिल्ह्यात जाणाऱ्या प्रवाशांनी 72 तासापेक्षा जुना नसलेला आरटीपीसीआर (आरटी-पीसीआर)निगेटीव्ह रिपोर्ट सोबत ठेवणे आवश्यक आहे.
कर्नाटक शासनाच्या आरोग्य व कुटुंब विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार आरटीपीसीआर निगेटीव्ह रिपोर्ट अनिवार्य आहे. या संदर्भात विजापूर जिल्हा सीमेवर चेक पोस्टची स्थापना केली असल्याचे सांगली जिल्हा प्रशासनास पत्रकाव्दारे कळविले आहे.







