जत,संकेत टाइम्स : जत शहराला स्वच्छ केल्याची जाहीरात बाजी करणाऱ्या नगरपरिषेदेच्या दारातच घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.नगरपरिषदेच्या इमारतीसमोरील गटारी कचऱ्यांने भरल्या आहेत.त्याशिवाय परिसरातील नागरिकांनी पाणी पुरवठा करणारा हातपंप गेल्या दोन वर्षापासून बंद आहे.इमारतीसमोरील मोहरमची ताबूत ठेवणाऱ्या इमारतीचे काम अर्धवट ठेवण्यात आले आहे.
शहरातील रस्त्यावरील खड्डे जीव घेतील इतके मोठे झाले आहेत.नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तब्बल 15 दिवसापासून रजेवर आहेत.या सर्वाचा फटका नागरिकांना फटका बसत आहे.तालुक्यातील दोन प्रमुख पक्षाचे नेते एकमेकावर चिखलफेक करत आहेत.त्यांनी जत शहरातील प्रश्नावर आवाज उठवावा,असे आवाहन युवा नेते विक्रम ढोणे यांनी केले आहे.
50 हजार लोकसंख्या असणाऱ्या जत शहरात वर्षाला कोट्यावधीचा निधी फस्त केला जात आहे.तरीही नागरिकांना पाणी,स्वच्छता, विज,रस्ते अशा मुलभूत समस्याही सुटत नाहीत,हे दुर्देव्य आहे.शहरात स्वच्छतेच्या नावावर कोट्यावधी रूपयाची उधळपट्टी करत स्वच्छ शहराची जाहीरात बाजी करत ढोल बडविण्यात येत आहे.
मात्र शहरातील गटारी,रस्ते,सार्वजनिक परिसरात घाणीच्या विळख्यात आहेत.त्यापेक्षा वाईट अवस्था जत नगरपरिषदेच्या इमारातीसमोर आहे.इमारती समोरील गटार कचऱ्याने भरली आहे,तेथेच असणारे हातपंप गेल्या दोन वर्षापासून बंद पडले आहे.ते चालु करण्यासाठी नगरपरिषदेची उदासीनता आहे. शहरातील अनेक नगरे, कॉलनीतील अवस्था भयवाह आहे.टक्केवारीच्या खेळात कोट्यावधीची कामे अर्धवट ठेवण्यात आली आहेत.
त्यापलिकडे शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने आढळून येत असताना कार्यालयाचे प्रमुख मुख्याधिकारी गेल्या पंधरा दिवसापासून रजेवर आहेत.इतकी भयानक स्थितीकडे दुर्लक्ष करत तिन्ही पक्षाचे नेते,नगरसेवक दुसऱ्याच मुद्यावर एकमेकावर आरोप करत आहेत.
‘लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण’
जत शहरात स्वच्छ शहराचे फलक लावून ढोल बडविणाऱ्या नगरपरिषदेच्या अंगणातच घाणीचे साम्राज्य पसरले आहे,हा प्रकार म्हणजे ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण’ याची प्रचिती आणून देणारा आहे.
जत शहरातील नगरपरिषदेच्या इमारतीसमोर गटारी घाणीने तुंबल्या आहेत.कार्यालया समोर बंद पडलेला हातपंप











