रोजगार हमी बंद पाडणाऱ्यांना आमदारांचा राजीनामा मागण्याचा अधिकार नाही ; कॉग्रेस नेत्यांचा आरोप | स्व:त काय केले ते सिध्द करा

0
8



जत,संकेत टाइम्स : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील दरोडेखोर असलेल्या भाजपा नेत्यांना आमदार विक्रमसिंह सांवत ़यांचा राजीनामा 

मागण्याचा कोणता नैतिक अधिकार आहे,ते त्यांनी तपासून पहावे,असे आवाहन कॉग्रेस नेत्यांनी भाजपच्या नेत्यांना पत्रकार बैठकीत केले.






यावेळी यावेळी कॉंग्रेसचे‌ तालुकाध्यक्ष अप्पाराया बिरादार,जत तालुका कॉंग्रेस कार्याध्यक्ष सुजय शिंदे,जि.प.सदस्य महादेव पाटील,माजी पं.स.सभापती बाबासाहेब कोडग,माजी मार्केट कमिटी सभापती संतोष पाटील,ओबिसी सेल्स जिल्हाध्यक्ष तुकाराम माळी ,जत माजी मार्केट कमिटीचे माजी सभापती अभिजित चव्हाण,माजी नगरसेवक महादेव कोळी,विक्रम फौंडेशनचे अध्यक्ष अँड. युवराज निकम,माजी नगरसेवक निलेश बामणे,मारुती पवार,माजी बांधकाम सभापती भूपेंद्र कांबळे,मल्लेश कत्ती आदी मान्यवर उपस्थित होते.






बिराजदार व शिंदे म्हणाले,गेल्या पंचवार्षिकमध्ये जिल्हापरिषद,पंचायत समिती,आमदार सत्तेत आल्यावर आरोप करणारे भाजपचे पदाधिकाऱ्यांनी रोजगार हमी योजनत कसा दरोडेखोर टाकत होते‌,हे तालुक्यातील जनतेला माहिती आहे.अधिकाऱ्यावर दबाव टाकून बेकायदेशीर कामे मंजूर करून कामे केली.रोजगार हमीच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला,त्यात हे सर्व आरोप करणारे दरोडेखोर सामील आहेत.त्यांच्यामुळे चोराला सोडून संन्याशाला फाशी असे जत पंचायत समितीचे प्रथम श्रेणी असलेले गटविकास अधिकारी व त्यांच्या समवेत अनेक अधिकारी कर्मचारी या भाजप दरोडेखोरांमुळेच फौजदारी कार्यवाहीला सामोेरे जावे लागले होते.






हे सर्व पाप तत्कालीन भाजपचे पदाधिकारी यांच्याकडून माजी आमदार विलासराव जगताप यांच्या आशीर्वादाने झाले आहे.हे तालुक्यातील आम जनतेला माहिती आहे.भ्रष्टाचारामुळे तालुक्यातील सर्वात मोठी विकासाची गंगोत्री असणारी रोजगार हमी योजना बंद पडण्याचे काम या लोकांनी केली.आज भाजपचे आम्ही एकसंघ म्हणणारी मंडळी अलिबाबा व त्याचे चाळीस चोर या कथेप्रमाणे काम करत आहेत.





विधानसभा निवडणुकीच्या वेळी हि मंडळी स्व:ताची खळगी भरण्यासाठी भाजपा म्हणून घेणाऱ्यांनी या नेत्यांनी वेगवेगळी चूल मांडून आम जनतेला फसवले,आता पुन्हा एकसंघ असल्याचे सांगत‌ सुटले आहेत.कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार जनतेशी नाळ जुळवून अनेक वैयक्तिक व सार्वजनिक कामे केल्याने आतापर्यंतच्या विक्रमी मताने निवडून आले आहेत.यामुळेच त्यांच्या पोटात पोटसूळ उठले आहे.आज एकत्र आलेली भाजपची उंदरे अनेक बिळात आतापर्यंत होती.आता आम्ही एकत्र आलो आहे,असे जनतेची दिशाभूल करत आहे.






जत‌ तालुक्यातील जनतेने पुर्ण विश्वासाने निवडून दिलेल्या आ.सांवत यांच्यावर आरोप करण्याअगोदर आपली योग्यता तपासून पहावी,असेही आवाहन कॉग्रेस नेत्यांनी केले.

जत तालुक्यात पावसापूर्वी पूर्व भागातील तलाव भरण्यासाठी कर्नाटक राज्याचे तत्कालीन जलसंपदा मंत्री एम.बी.पाटील यांच्याकडे विक्रमसिंह सावंत आमदार नसताना अनेक वेळा माणुसकीच्या दृष्टीने शक्य होईल तेवढे दुष्काळी भागाला पाणी द्या,असे विनंती केली,त्यामुळे  तुबची बबलेश्वर योजना चालू ठेऊन पूर्व भागातील अनेक तलाव भरून दिले. हे त्याभागातील लाभार्थी शेतकऱ्यांना चांगले माहित आहे.





आज टीका करणारे त्या भागातील एकही कार्यकर्ता नाही.टीका करण्यापूर्वी त्या भागातील शेतकऱ्याकडे जाऊन माहिती घेऊन टीका करावी.भाजपचे सर्व पदाधिकारी नगरपालिकेचे नगर सेवक कामे सुचवू शकतात परंतु त्यास निधी आणण्यासाठी आमदारांचे प्रयत्न व शिफारस लागते.हि बाब आपल्या माजी आमदारांना विचारून घ्या.निट माहिती न घेता लुंग्या सुंग्याला टीका करायला लावण्याचा धंदा भाजपने बंद करावा.






गेल्या पंचवार्षिक विधानसभेच्या कारकीर्दमध्ये भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी शेवटच्या वर्षी विधानसभेत तालुक्यातील जिवंत प्रश्न न मांडता दोन मिनिटाच्या वेळेत तालुक्यातील अवैद्य धंदे यावर औचित्याचा मुद्दा मांडला.याशिवाय एकही ज्वलंत प्रश्न मांडला नाही.आमच्या पक्षाचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी दीड वर्षाच्या कालावधीमध्ये झालेल्या तिन्ही अधिवेशनात तालुक्यातील जिवंत प्रश्नावर 20-25 मिनिटे जनतेच्या व्यथा सभागृहात व्यक्त केल्या.





आमच्या आमदारांना पाणीदार आमदार म्हणून आम जनतेनी भूषण दिलेले आहे.हे पाहून आपल्या पोटात दुखत आहे,म्हणून टीका करू नका.विद्यमान आमदार आत्तापर्यंतच्या तालुक्यातील आमदारांपैकी हुशार,तरुण,तडफदार असून चांगले काम करत आहेत. विरोधी पक्षाच्या माजी आमदार जुने झाल्याने त्यांच्याकडून या तालुक्यात काही काम होणार नाही.आमच्या पक्षात आमच्यावर टीका करणाऱ्या लोकांसारखे वाळू तस्कर,अवैद्य धंदे करणारे,कॉंग्रेस पक्षात नाहीत.






भाजप मधले वाळू तस्कर,अवैद्य धंदे वाल्यांचे दुकान बंद पडल्याने खोटे-नाटे आरोप करणाऱ्या शिवाय त्यांच्याकडे दुसरे काम नाही.यापुढे लुंग्या सुंग्याची टीका खपवून घेतली जाणार नाही.आमचा कॉंग्रेस पक्ष एकसंघ आहे.आपल्या पक्षात एक पडळकर गट,चंद्रकांत पाटील गट,विलासराव जगताप गट,संजय काका पाटील गट असे 4 घरात राहणाऱ्या मंडळींनी आमच्या घराकडे बोट दाखवू नये.





महामार्गाचे अतिक्रमण सिध्द करा,राजकीय सन्यास घेतो.


भाजपने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कॉग्रेसचे नेते सुजय शिंदे यांनी आपले दुकान जाते म्हणून त्या भागातील महामार्ग चार फुटाने कमी केला,असे आरोप केले होते.यावर बोलताना शिंदे म्हणाले, माझे अतिक्रमण आहे‌,हे‌ सिध्द करा,मी राजकीय सन्यास घेतो,असे खुले आवाहन दिले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here