संकेत टाइम्स : जतमध्ये मंगळवारी कोरोना रुग्णाची एकदोनवर असणारी संख्या पाचपट वाढत एकाच दिवशी 22 पॉझिटिव्ह रुग्णापर्यत पोहचली आहे.
जत शहरासह तालुक्यात यापुर्वीच कोरोना धोका व्यक्त होत होता. आता झालेही तसेच आहे.यापुर्वी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे नातेवाईकाचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चिंता वाढली आहे.
मंगळवारी जत 10,काशिलिंगवाडी 6 व धुळकरवाडी 1,धावडवाडी येथे 1 रुग्ण,अन्य ठिकाणी 4 असे एकाच दिवशी तब्बल 22 रुग्ण आढळून आले आहेत.जत तालुक्यातील कोरोना बाधित संख्या अचानक वाढल्याने पुन्हा चिंता वाढली असून आतापर्यत 2399 जण कोरोनाच्या विषाणूचा जाळ्यात आले आहे. सध्या तालुक्यात 44 रुग्ण उपचाराखाली आहेत.
दरम्यान जिल्ह्यातही कोरोनाचा उद्रेक कायम असून मंगळवारी 87 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.सांगली महापालिका 31, आटपाडी 12,खानापूर 3,तासगाव 5,जत 22,मिरज 3,शिराळा 2,वाळवा 9 यातालुक्यातही झपाट्याने कोरोना बाधिताची संख्या वाढत आहेत.
राज्यभर कोरोना दुसरी लाट सुरू असताना सांगली जिल्ह्यात मात्र कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या गेल्या दोन दिवसापुर्वी आटोक्यात होती.मात्र गेल्या दोन दिवसात तब्बल 170 च्या पुढे कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने जिल्ह्याची स्थितीही लॉकडाऊनच्या दिशेने सुरू झाली आहे.
जतेत तपासण्या वाढविण्याची गरज
जत तालुक्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून,कोरोनाचा संसर्ग रोकण्यासाठी गतवेळी प्रमाणे कोरोना तपासण़्या वाढविण्याची गरज आहे. त्याशिवाय कंटेनमेंट झोन करण्याची गरज निर्माण झाली आहे.








