जत,संकेत टाइम्स : माडग्याळ ता.जत येथील ग्रामपंचायतीने 2017 पासून तब्बल 5 वर्षापासून अंपग निधी दिलेला नाही.अपंग बांधवांनी ग्रामपंचायतीकडून उडवाउडवाची उत्तरे दिली जात असून ग्रामपंचायतीचे बेजबाबदार ग्रामसेवक व पदाधिकाऱ्यांमुळे अंपगाचे हाल होत आहेत.यांची चौकशी करून संबधितावर कठोर कारवाई करून निधी द्यावा,या मागणीचे निवेदन देवा फांऊडेशनच्या वतीने प्रांताधिकारी प्रंशात आवटे यांच्याकडे केली आहे.
माडग्याळ ग्रामपंचायतीचा भोगळ कारभाराची चर्चा सातत्याने होत असताना,अंपगाचा निधीही हडपण्याचा उद्योग ग्रामपंचायतीकडून होत असल्याचा आरोप अंपग संघटनेकडून करण्यात येत आहे. तब्बल 2017- ते 2021 तब्बल पाच वर्षापासून अंपग निधी देण्यात आलेला नाही.
प्रत्येकवेळी ग्रामसेवक वेगवेगळी कारणे देऊन अंपगाना बेदखल करत असल्याचेही सांगण्यात आले. येत्या दहा दिवसात अंपगांना निधी देण्यात यावा अन्यथा जत पंचायत समिती समोर उपोषण करू असा इशाराही निवेदनात दिला आहे.संतोष हरणे,अनिल बिराजदार,सिध्दु माळी,सुनिल कोळी,महेंद्र हटकर,संतोष माळी,विशाल शिंदे आदी उपस्थित होते.
माडग्याळ ग्रामपंचायतीने अंपग निधी तातडीने द्यावा,या मागणीचे निवेदन देण्यात आले.








