शेगाव,संकेत टाइम्स : येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेने शेगांवमध्ये एटीएम मशीन बसवावे,अशी मागणी बँकेच्या खातेदारांनी बँकेकडे केली आहे.
शेगांव गावालगतची पंधरा ते सोळा गावातील नागरिक हे बँक ऑफ महाराष्ट्र शाखा,शेगांवचे खातेदार आहेत.सातत्याने कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता भितीदायक वातावरण निर्माण होते.
मात्र पर्याय नसल्याने पैसे,काढणे,भरणे व विविध कामासाठी बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी होते.या गर्दीपासून सुटका करण्यासाठी बँकेने एटीएम सुरू करावे,अशी मागणी आहे.
शेगांवचे प्रतिष्ठित डॉ.शिवाजी खिलारेकिराणा मालाचे व्यापारी संदिप गायकवाड,रणजित माने, सत्यजित नाईक,बबन निकम व आदी नागरिकांनी एटीएम बसविण्याची मागणीचे निवेदन बँकेकडे केली आहे.







