जतच्या आमदारांनी राजीनामा द्यावा ; भाजपा नेत्याचे आवाहन | निधी आणलेची घोषणा फसवी | Jat MLAs should resign BJP leader’s appeal | The announcement of funds was fraudulent

0
13



जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात आमदारांनी निधी बाबत सांगितलेले आकडे बोगस आहेत.,जिल्हा परिषद,जिल्हा नियोजन,पंचायत समितीचे निधी हे भाजपा पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आले आहेत.राज्य शासनाकडून आलेल्या निधीचे आकडे आमदारांनी जाहीर करावेत,उद्घाटनाला बोलविले नाही म्हणून हक्कभंग करणारे आमदार सांवत हे म्हैसाळ सारख्या पाणी योजनेला निधी आणण्यात अपयशी ठरले आहेत,त्यामुळे त्यांनी घोषित केल्याप्रमाणे राजीनामा द्यावा,असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य,सरदार पाटील,तम्मणगोंडा रविपाटील,अँड.प्रभाकर जाधव,सुनिल पवार,उमेश सांवत,लक्ष्मण जकगोंड या भाजपा नेत्यांनी केले.







शनिवारी आमदार सांवत यांनी पत्रकार बैठक घेऊन 112 कोटीचे निधी आणल्याचे बोगस आकडे सांगून जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप करून निधी कुणी आणला याबाबतचा खुलासा भाजपा नेत्यांनी मांडली.

यावेळी माजी आमदार विलासराव जगताप,तम्मा सगरे,प्रकाश माने,संतोष मोटे,बसवराज चव्हाण,गौतम ऐवळे,सदाम आत्तार,प्रकाश मोटे,अजिंक्य सांवत,संतोष कोळी,सुरेश शेगुणशी आदी उपस्थित होते.








सुनिल पवार म्हणाले,पाण्यासाठी आमदारकी पणाला लावतो,म्हणून प्रतिष्ठेचा मुद्दा करत आमदार सांवत निवडून आले आहेत.त्या योजनेसाठी 

त्यांनी दीड वर्षात फक्त दुरूस्तीसाठी एक कोटी निधी आणू शकले नाहीत.दुसरीकडे माजी आमदार विलासराव जगताप यांनी त्यांच्या काळात म्हैसाळ योजनेला चारशे कोटीचा निधी आणला होता.जिल्हा परिषद,पंचायत समितीचा निधी सदस्यांनी आणला आहे.अंगणवाडी,शाळा खोल्यांना जिल्हा परिषदेतून साडेतीन कोटी,व इमारत दुरूस्तीसाठी 80 लाखाचा निधी महिला बालकल्याण विभागातून आम्ही आणला असतानाही ते मी निधी आणल्याचे सांगत आहेत.





अगदी आ.सांवत यांनीही आमच्याकडे निधी मागणीचे पत्र दिले आहे.पिक विम्याचे ही पैसे मी आणला म्हणून सांगत आहे,ती जनतेची थेट फसवणूक आहे.म्हैसाळ,तुबची-बबलेश्वर योजनेच्या नावावर त्यांनी दिशाभूल केली असून त्यांचे भांडवल करून ते निवडून आले आहेत.त्यासाठी निधी आणण्यात ते अपयशी ठरल्याने त्यांनी नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनामा द्यावा.




तम्मणगौंडा रवीपाटील म्हणाले,जिल्हा परिषद शाळेसाठी 91 खोल्यासाठी प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे.प्रत्येकी 8 लाख 75 हजार प्रमाणे 7 कोटी 96 लाख,25 हजार इतकी रक्कम जिल्हा नियोजन मधून मिळाली आहे.जलजीवन,शाळा खोल्या,पाणीपुरवठा साडेचार कोटीचा निधी आला आहे.त्यासाठी जिल्हा परिषद सदस्यांनी पाठपुरावा केला होता.म्हणून हा निधी आला आहे, यात आमदार सांवत यांचा काहीही सहभाग नाही,मी स्व:ता 91 खोल्या मंजूर केल्याचे कागदपत्रे पाटील यांनी दाखविली.







तीन आरोग्य केंद्र,उपकेंद्रासाठी सुमारे 4 कोटीचा निधी मिळाला आहे.तो जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी आणला आहे.आ.सावंत हे जिल्हा नियोजनमध्ये नियंत्रित सदस्य आहेत,आम्ही निवडून आलेले सदस्य आहोत.

अँड.प्रभाकर जाधव म्हणाले,शेगाव मतदार संघात माजी आमदार विलासराव जगताप यांनी मंजूर केलेली केटीवेअरचे उद्घाटन आमच्या अगोदर आ.सांवत करतात.





त्यांना उद्घाटनला बोलविले नाहीत,म्हणून संबधित अभियंते,ठेकेदारांना खालच्या पातळीवर अपशंब्द वापरून काम बंद ठेवले, काम पुर्ण नसल्याने गत पावसाळ्यात पाणी साठवता आले नाही.काही अधिकारी ऐकत नाहीत म्हणून त्यांची बदली करण्याचे काम आमदार सांवत करत असून ते बदली आमदार आहेत,अशी टिकाही जाधव यांनी केली.






सरदार पाटिल म्हणाले,आमदार सांवत हे आमदार झाल्यापासून तालुक्यात एकाही बंधाऱ्याला निधी आलेला नाही.आम्ही पाठपुरावा करून जिल्हा नियोजन मधून निधी आणला आहे.कोल्हापूरी बंधाऱ्यासाठी राज्य शासनाकडून निधी मिळतो,तो त्यांनी आणावा.






उमेश सांवत म्हणाले,जत नगरपरिषदेत माजी नगरसेवक अनेक कामात ढवळाढवळ करत आहेत.अनेक कामात ते कमिशन मिळवत आहेत.अनेक ना हरकत पत्रे बोगस देण्यात आली आहेत.एका नगरसेवकांची जागा वाचविण्यासाठी महामार्गाचे 4/4 फुटाने काम कमी केले आहे. त्यामुळे जतचे मोठे नुकसान झाले आहे.







नगरपरिषदेत सुमारे 4 कोटीचा भष्ट्राचार झालेला आहे.त्याविरोधात आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.काही नगरसेवकांनाचा कमिशनचा धंदा बंद केला,म्हणून आमदारांनी मुख्याधिकारी यांना दमबाजी केली आहे. त्यामुळे ते गेल्या 15 दिवसापासून मेडिकल रजेवर गेले आहेत.आमदारांनी खराच निधी आणला असेलतर त्यांनी अगोदर त्यांच्या घरासमोरील रस्ता दुरुस्त करावा.प्रथम कॉग्रेसमधील गटबाजी त्यांनी संपवावी,असे आवाहनही सांवत यांनी केले.







लक्ष्मण जकगोंड म्हणाले,आमदार विक्रमसिंह सावंत निधी आणल्याची सांगत जनतेची दिशाभूल करत आहेत.112 कोटी निधीतून कुठे कामे सुरू आहेत.हे आ.सांवत यांनी सांगावे. जत नगरपरिषदेत सत्ता असतानाही ते गुडघ्याऐवढे खड्डे मुजवू शकले नाहीत.




 



भाजपची एकसंघ पत्रकार परिषद


जत भाजपात गटबाजी असल्याचे आरोप कॉग्रेसच्या नेत्यांनी केले होते.मात्र रविवारी घेण्यात आलेल्या पत्रकार बैठकीत भाजपचे बहुतांश पदाधिकारी,नेते एकत्र आल्याने आम्ही एकसंघ आहोत,हे दाखवून देण्यात आले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here