भाजपकडून अंबानी कुटुंबासाठी महाराष्ट्राची बदनामी नाना पटोलेचे‌ गंभीर आरोप

0
4



सांगली : भाजपकडून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा उद्योग सुरू आहे. तसेच अंबानीसाठी महाराष्ट्राच्या विधानसभेचा भाजपाकडून दुरुपयोग करण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. तसेच राज्यातील वीज तोडणीवरून सरकारला गर्भीत इशाराही नाना पटोले यांनी दिला आहे. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.





काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांनी सांगलीमध्ये आज पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. सचिन वाझे प्रकरणावरून बोलताना महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी सचिन वाझेला खलनायक ठरवण्याचे काम भाजपकडून करण्यात आलेलं आहे. 





डबल ढोलकी वाजवण्याचे काम भाजप करत असून मनसुख हिरेन प्रकरणी तपास आता एनआयएकडून सुरू आहे, त्यामुळे त्यांचा तपास होईल, असेही पटोले म्हणाले. 

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here