उमराणी,संकेत टाइम्स: उमराणी ता.जत येथे गेल्या दहा वर्षापासून रूतलेला विकासाचा रथ गतीने ओढण्याची जबाबदारी नव्या पदाधिकाऱ्यांच्या खाद्यावर आहे,तो त्यांना पेलावा लागणार आहे.गेल्या दहा वर्षापासून असणाऱ्या अर्धवट गटारी,रस्त्यावरील सांडपाणी,आरोग्य सुविधा,रस्ते,पाणीपुरवठा सारख्या समस्या सोडविण्याचे आवाहन पुर्ण करावे,अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.
जगाच्या इतिहासात उमराणीचा रणसंग्राम म्हणून प्रतापराव गुजर यांच्यामुळे आजमाअमर झालेले गाव तसे विकासाच्या दृष्टीने मागे राहिले आहे.गतवेळच्या सत्ताधाऱ्यांना मोठी संधी असतानाही म्हणावा तसा विकास साधता आला नसल्याची ओरड आहे.
दहा वर्षाच्या या सत्तेला सुंरूग लावून भाजपा प्रणीत पँनेलने विजयी पताका लावली आहे.नवे दमदार सदस्य निवडून आल्याने त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.त्याशिवाय जिल्हा परिषद सदस्य उमराणीतील असल्याने जिल्ह्यातून निधी खेचून आणण्याची जबाबदारी आता त्याच्याकडे आली आहे.
सध्या गावात गटारी,आरोग्य उपकेंद्रातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी उपस्थिती ठेवणे,रस्ते,पाणी टंचाई,अतिक्रमणे हटविणे,प्रमुख चौकाचे सुशोभीकरण करून स्वच्छ, सुंदर गाव करावे,अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
भष्ट्राचाराचा डाग हटविण्याची गरज
उमराणीतील गत सत्ता काळातील काही कामावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले आहेत.जिल्हा पातळीवरून त्यांच्या चौकशा सुरू आहेत.भष्ट्राचाराचा डाग हटविण्याची जबाबदारी नव्या सदस्यावर आहे.








