माडग्याळ, संकेत टाइम्स : माडग्याळ ता.जत येथील डॉ.चंद्रमणी उमराणी संजीवनी हॉस्पिटल व श्री टेके आय क्लिनिक सांगली यांच्या वतीने मोफत डोळे तपासणी शिबीर संपन्न झाले.
यावेळी युवराज कांबळे, डॉ.दिपिका चव्हाण,साजिला शेख, सतिश थोरात,बसू नाटेकर,पिरापा कांबळे, किरण कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते .
या शिबीरात डोळ्यातून पाणी येणे,तिरळेपणा,रंग छटा तपासणी,मोती बिंदू ,विटामिन अ ‘ची कमतरता, डोकेदुखी, आदी डोळ्याच्या आजाराची तपासणी करण्यात आली.
यावेळी डॉ.दिपिका चव्हाण म्हणाले की , डोळ्याचे आरोग्य संभाळा,मोबाईल पासून चार हात दूर रहा,आपले डोळे हे शिरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव पैंकी एक आहे.
महात्मा जोतिबा फुले,जन आरोग्य योजनेअंतर्गत तसेच आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत होणाऱ्या (पिवळ्या व केसरी) रेशनकार्ड धारकांना सर्व नेत्र शास्त्रकिया मोफत केल्या जातील.यामध्ये लासरु,डोळ्यातील मांस,तिरळेपणा,बुबुळाच्या पापणीच्या,पडद्याच्या या सर्व शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील,तसेच गरजू लोकांना सवलतीच्या दरात चष्मे वाटप करण्यात येतात,असेही डॉ.म्हणाल्या.
माडग्याळ ता.जत येथे आयोजित डोळे तपासणी शिबिरात रुग्णांनी लाभ घेतला.








