जत,संकेत टाइम्स : जत शहरात उभारण्यात येत असलेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा 14 एप्रिल पर्यत उभा करून,अनावरण करू असे प्रतिपादन आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केले.
जत येथील आंबेडकर उद्यान येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या चाबूतारा कामाचे भूमीपुजन आ.सांवत यांच्याहस्ते संपन्न झाले.
यावेळी माजी सभापती बाबासाहेब कोडग,डॉ.रवींद्र आरळी,नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवर,उपनगराध्यक्ष आप्पासाहेब पवार,माजी सभापती भुपेंद्र कांबळे, युवक नेते विक्रम ढोणे,विक्रम फाऊंडेशनचे अध्यक्ष अँड.युवराज निकम,रिपाईचे जिल्हा अध्यक्ष संजय कांबळे,राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष उत्तम चव्हाण,कॉग्रेसचे कार्याध्यक्ष सुजय शिंदे,माजी सरपंच अतुल कांबळे, श्रीकांत शिंदे,बांधकाम सभापती नामदेव काळे, शिक्षण सभापती प्रकाश माने,नगरसेविका जयश्री मोटे,जयश्री शिंदे,गणेश गिड्डे,आकाश बनसोडे आदीजण उपस्थित होते.
आमदार विक्रमसिंह सावंत पुढे म्हणाले की,जत येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचा मार्गदर्शक ठरले असा विकास करण्यात येणार आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा भव्यदिव्य असा असणार आहे.तसेच येथेच वाचनालय, मॉर्निंग वाँक मार्ग आदी कामे करण्यात येतील.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे 14 एप्रिलला अनावरण व्हावे,अशा पध्दतीने पुतळा समितीने तामे करून घ्यावीत.
डॉ.रवींद्र आरळी म्हणाले की,हे उद्यान जत शहराच्या वैभवात भर पडणारे असून तसेच जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र व ग्रंथालय उभा केल्यास डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन ठरेल,
अभ्यासिका उभारण्यासाठी लागेलती मदत करण्याचे आश्वासन डॉ.आरळी
यांनी दिले.
रिपाईचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे म्हणाले,याठिकाणी पुतळा उभा करण्यासाठी गेल्या 35 वर्षांपासून प्रयत्न सुरू होते.अनेक तरुण रस्त्यावर उतरले होते.अनेक तरुणांवर गुन्हे दाखल झाले होते.पुतळ्याचे स्वप्न आज पूर्ण होत असून आमदार विक्रमसिंह सावंत यांनी चाबूताऱ्याचा सर्व खर्च स्वतःच्या पैशातून दिलेला आहे,त्याचे आम्ही ऋुणी आहोत.
माजी सरपंच अतुल कांबळे म्हणाले की,आज या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम पूर्ण होत असून त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज व बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याचे काम मार्गी लागावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
माजी सभापती भुपेंद्र कांबळे म्हणाले की,जतचे संस्थानिक श्रीमंत विजयसिंह राजे डफळे यांनी 5 मार्च 1934 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जत मध्ये आणले होते.ही बाब जतकरांसाठी अभिमानाची आहे.याठिकाणी उद्यान होण्यासाठी अनेक अदोलने करण्यात आली.
तर ज्यावेळी पुतळा समितीची बैठक बसली त्यावेळी चाबूताऱ्याचा खर्च कोणाकडून घ्यायचा हा प्रश्न पडला होता.पण जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांना शब्द देताच त्यांनी तात्काळ चाबूताऱ्यासाठी लागणारा सर्व खर्च उचला,मी त्याची आभारी असे सांगत हे उद्यान जतच्या वैभवात भर पडणारे असे असे कांबळे म्हणाले.
जत येथे उभारण्यात येत असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा चाबूतारा उभारणी कामाचे भूमिपुजन करण्यात आले.












