उमराणी : उमराणी ता.जत ग्रामस्थांनी आमदार विक्रमसिंह सांवत यांच्या
हक्कभंग प्रस्तावाचा निषेध केला.आ.सांवत यांनी एकाही विकास कामाला निधी दिला नाही,त्यामुळे त्यांना विकासकामांच्या उद्घाटनाना बोलविण्यात आले नाही.आ.सांवत यांनी उमराणीसाठी 50 लाखाचा निधी द्यावा,त्यांचा भव्य सत्कार व विकास कामाचे उद्घाटन त्यांच्याहस्ते करू,असे आवाहन संरपच विजयकुमार नामद व उपसंरपच संजय शिंदे यांनी केले.
उमराणीतील पशूवैद्यकीय दवाखान्याचे काम जिल्हा परिषदेकडून करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्याहस्ते व माजी आमदार विलासराव जगताप सह मान्यवरांच्या उपस्थितीत केले आहे. त्यात आ.सांवत यांनी नाराज होण्याची गरज नव्हती.
त्यांनी निधी दिला तर त्यांच्याहस्तेही विकास कामाचे उद्घाटन करण्यात येईल,विरोधी गटाच्या चुकीचे राजकारण करू नये.साध्या विषयासाठी आ.सांवत यांनी विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल करून काय साध्य केले हाही महत्वाचा विषय आहे.शासकीय कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी यांना आम्ही नियंत्रित केले होते.त्यात काहीही चुकीचे केले नाही,असेही नामद व शिंदे म्हणाले.







