जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात कोरोना व अतिवृष्टीमुळे झालेल्या आर्थिक कोंडीमुळे महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांवर राहिलेले फी भरण्यासाठी सक्ती करण्यात येऊ नये तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होणार नाही यांची राजे रामराव महाविद्यालयाने काळजी घ्यावी,अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा संभाजी ब्रिगेडकडून देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे, राजे रामराव महाविद्यालय जत येथील नोटीस बोर्ड वर सक्तीने फी भरण्यात यावी,अशी नोटीस लावली आहे.ही थेट अडचणीतील पालकांची पिळवणूक करणारे आहे.
लाकडाऊन झाल्यामुळे तुमच्यासह सर्व जण गेल्या दहा महिन्यापासून फिजिकली घरीच आहेत.अनेक पालक शेतकरी गरीब कुटुंबातील असल्यामुळे अतिवृष्टीमुळे तसेच कोरोनामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जात आहे.
त्यांना आपल्या पाल्यांची फी भरणेही शक्य नाही.असे असताना जतच्या राजे रामराम महाविद्यालयाने सक्तीने फी वसूली सुरू केली आहे.फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांचे परिक्षेचे फार्म भरून घेण्यात येणार नाहीत,अशी हिटलरी आदेश काढण्यात आले आहेत.
तशी नोटिस लावण्यात आली आहे.त्यात सूचना क्रमांक सात मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी शै.वर्ष 2020-21 करीता ई.बी.सी व भारत सरकार शिष्यवृत्ती अर्ज भरलेला आहे.त्या विद्यार्थ्यांना नियमानुसार पूर्णपणे फी भरण्याची गरज नाही असे म्हटले आहे. तरीही नोटीस बोर्डवरील मुद्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी अर्धी फी भरलेले आहे. ई.बी.सी स्कॉलरशिप फॉर्म भरलेले आहेत. नियमानुसार विद्यार्थ्यांना नंतर फी भरण्याची गरज नाही. त्यांना आर्थिक अडचण असताना जागतिक महामारी असताना त्यांना परीक्षा फॉर्म भरण्यासाठी कार्यालयाकडून अडवले जात आहे.
हा प्रकार थांबवावा,अन्यथा
संभाजी ब्रिगेडतर्फे आंदोलन करण्यात येईल.तसे निवेदन राजे रामराव महाविद्यालय जतचे प्रभारी प्राचार्य डॉ.ए.के.भोसले यांना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाकार्याध्यक्ष श्रेयश नाईक,तालुका उपाध्यक्ष रोहित चव्हाण,जत शहर अध्यक्ष प्रमोद काटे,तालुका कार्याध्यक्ष खंडू शिंदे,सामाजिक कार्यकर्ते संदिप नाईक यांनी दिले.










