डफळापूर, संकेत टाइम्स : डफळापूर ता.जत येथील जि.प.मुलींची शाळा नं 2, येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.यावेळी महात्मा फुले ब्रिगेड महाराष्ट्र राज्य,शाखा जत यांचे मार्फत लेखन साहित्याचे वाटप करणेत आले.
यावेळी चेअरमन दत्त पतसंस्था बाबासाहेब माळी,जिल्हाध्यक्ष सचिन माळी,तालुकाध्यक्ष चंद्रकांत माळी,
विकास माळी, दत्तात्रय माळी, प्रवीण माळी, मनोज पोळ, किशोर कोरे,अलका पवार, सुषमा चव्हाण, दीपाली पट्टणशट्टी उपस्थित होते.
नामदेव माळी म्हणाले,सावित्रीबाई फुले यांचे कार्य अतुलनीय आहे.त्यांनीच स्ञी शिक्षणाचा पाया रचला.त्यामुळे त्यांचे कार्य स्मरणीय ठेवत,सामाजिकतेचे भान ठेवा,असे सांगत सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्योगरत्न संकपाळ यांनी तर आभार शंकर कुंभार यांनी मानले.
डफळापूर : महात्मा फुले ब्रिगेडकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.







