रस्ता खुला करेपर्यत उपोषण | कोसारीतील नागरिकांचा पवित्रा | अधिकाऱ्यांनी ऐनवेळ निर्णय बदलला

0
6



जत,संकेत टाइम्स : कोसारी ता.जत येथे जबरदस्तीने बंद केलेला ग्रामपंचायत ते गुळवंची रोड पर्यत जाणारा गावातील रस्ता खुला करावा यासाठी रासपचे युवा किसन टेंगले व ग्रामस्थांनी बुधवार पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

कोसारी येथील ग्रामपंचायतीचा रस्ता काही राजकीय पुढाऱ्यांने जबरदस्तीने कचरा टाकून बंद केला आहे.तो खुला करावा म्हणून ग्रामपंचायत, पंचायत समितीकडे गेल्या सहा महिन्यापासून नागरिक पाठपुरावा करत आहेत.






मात्र अद्यापपर्यत रस्ता खुला करण्यात आलेला नाही.जूना रहदारीचा असणारा हा रस्ता एका राजकीय पुढाऱ्यांने बळकाविण्याच्या उद्देशाने बंद केला आहे. तो तात्काळ खुला करण्याची मागणी आहे.बुधवारी उपोषण कर्त्यांची पंचायत समितीचे अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांनी भेट घेतली.प्रांरभी रस्ता तात्काळ खुला करू म्हणून अधिकाऱ्यांनी पवित्रा घेतला होता.





मात्र ऐनवेळी फोनाफोनी झाल्याने उपस्थित अधिकाऱ्यांनी निर्णय बदलत दोन दिवसांनी बघू असे‌ सांगितल्याने उपोषण कर्ते संतप्त झाले आहेत.त्यामुळे उपोषण सुरू ठेवण्यात आले आहे.रस्ता खुला झाल्याशिवाय माघार घेणार नाही,असे किंसन टेंगले यांनी सांगितले.




कोसारी ता.जत‌ येथे सार्वजनिक रस्ता बंद खुला करावा,या मागणीसाठी उपोषण सुरू करण्यात आले आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here