जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात महसूलचे सातत्याने सर्व्हर डाऊन होत असल्याने फेरफार,नोंदीसह इतर कामे वेळेत होत नाही,नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे,त्यामुळे जोपर्यत सर्व्हर व्यवस्थित होत नाही, तोपर्यत तालुक्यातील 6 मंडल अधिकारी व 40 तलाठ्यांनी सोमवार पासून काम बंद आंदोलन सुरू केले आहेत.परिणामी नागरिकांना पुन्हा नव्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
जत तालुक्यातील महसूलच्या कामासाठी पुणे,सांगली येथील सर्व्हरमधून ऑनलाइन कामे करावी लागतात.
गेल्या काही महिन्यापासून सर्व्हर डाऊन असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. मात्र संबधिताकडून दखल घेतली जात नाही.परिणामी नागरिकांची कामे वेळेत होत नाहीत.त्यामुळे त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. म्हणून आम्ही सोमवार पासून काम बंद आंदोलन करत डीएसजे तहसीलदारांकडे दिल्या आहेत.जोपर्यत सर्व्हर लाऊनचा प्रश्न मिटत नाही तोपर्यत काम सुरू न करण्याचा पवित्रा मंडल अधिकारी, तलाठ्यांनी घेतला आहे.






