जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात कोरोनाची स्थिती अजूनही नियंत्रणात आहे.गेल्या तीन दिवसात तीन नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.मंगळवारी शेगाव 1,बागलवाडी 1 येथे नवे रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यात सध्या 32 विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत,तर 9 जण होम आयसोलेशन मध्ये आहेत.आतापर्यतची बाधित संख्या 2092 झाली आहे.त्यापैंकी 1995 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 75 जणांचा दुर्देवाने मुत्यू झाला आहे.
तालुक्यातील कोरोना मुक्त होणारी टक्केवारी 95 टक्के आहे.





