जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील महसूल व वन विभागातील अधिकारी,कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरावीत,अशी मागणी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी विधानसभेत केली.जत तालुक्यातील संख येथे महसूलचे अप्पर तहसील कार्यालय आहे.त्या अतर्गंत 65 गावे आहेत.मात्र तेथे कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे.त्याशिवाय वाहन व चालक नसल्याने मोठी गैरसोय होत आहे.त्याचबरोबर जत तालुक्यातील वनविभागात कर्मचारी संख्या अपुरी आहे.
त्याशिवाय वनविभागाची दहा बिट आहेत.तेथील फक्त दोन बिटला कर्मचारी राहण्याची सोय आहे.मात्र आठ ठिकाणी तशी सोय नाही.तेथे निवासस्थाने बांधावित अशी अशीही मागणी आ.सावंत यांनी केली.
सोलापूर विद्यापिठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुतळा उभारावा
सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिले आहे.तेथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारावा म्हणून जतचे युवा नेते विक्रम ढोणे यांनी उपोषण केले होते.त्यांचा धागा धरून आमदार सांवत यांनी मंत्री महोदयांनी जाहीर केल्याप्रमाणे विद्यापिठात पुण्यश्लोक अहिल्यादेवीचा पुतळा लवकरात लवकर उभा करावा,अशीही आ.सावंत यांनी मागणी केली.








