माडग्याळ, संकेत टाइम्स : माडग्याळ ता.जत येथील कोरे वस्ती येथे राहणाऱ्या शिवानंद सिद्राम कोरे यांच्या घरी दिवसाढवळ्या धाडसी चोरीची घटना घडली आहे.यात सुमारे सात लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे.कोरे देवीचे पुजारी असल्याने देवीचे सोने त्यांच्या घरी होते.याबाबत उमदी पोलीसात नोंद झाली आहे.एका संशयितास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,
रस्त्यावर कोरेवस्ती येथे राहण्यासाठी
आहेत. माडग्याळ गावापासून पासुन 2 किमी अंतरावर त्यांचे घर आहेत.शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास शिवानंद कोरे हे घर बंद करून कुंटुबियासह आठवडा बाजार असल्याने खरेदीसाठी गावात आले होते.याचा फायदा घेऊन चोरट्यांनी घराचा दरवाज्या तोडून घरामध्ये प्रवेश करत तिजोरीतील दोन अंबाबाआई देवीची तोळ्याचे मंगळसुत्र,अडीच तोळ्याचा देवीचा हार,अर्धा तोळ्याची चैन,नथ,डोळे मोती,2 तोळ्याचे लॉकेट,दीड तोळ्याची अंगठी,कर्ण फुले असे 11 तोळ्याचे दागिणे,एक किलो चांदी व रोख रक्कम 1 लाख 80 हजार असा सात लाखाचा मुद्देमाल लंपास केला.दुपारी बाजार करून
घरातील मंडळी शेताकडे गेले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.
घटनेची माहिती उमदी पोलिसाना देण्यात आली असुन उमदीचे सहायक पोलिस निरिक्षक दत्तात्रय
कोळेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून सांगलीवरून श्वान
पथकाला पाचारण करण्यात आले आहे.
दरम्यान गुरूवारी रात्री एक पानाड्याचा मुक्काम कोरे यांच्या घरी होता.तो सकाळी उठून गावी गेला होता.मात्र फोनवरून बोलताना गडबडल्याने संशयित म्हणून
त्याला ताब्यात घेऊन त्याची पोलिस कसून चौकशी करीत आहेत.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.








