जतेत सोमवारी नवे सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण | जिल्ह्यात दोघाचे मुत्यू

0
2



संख,संकेत टाइम्स : कोरोना दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या आदेशानुसार उमदी पोलीसाकडून विना मास्क, गर्दी रोकण्यासाठी मोहिम राबविण्यात येत आहेत.





सोमवारी संख आठवडा बाजाराच्या‌ गर्दी व विना मास्क नागरिकांना कारवाईचा दणका दिला.विना मास्क फिरणाऱ्या 10 जणावर कारवाई करत दोन हजार रूपयाचा दंड वसूल केला.

सा.पो.नि.दत्तात्रय कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरिक्षक सय्यद‌ यांच्या पथकाने ही कारवाई केली.







दरम्यान जत शहरात विना मास्क व सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाला असतानाही जत पोलीस ठाण्याचे अधिकारी,कर्मचारी गांर्भिर्याने घेत‌ नसल्याचे स्पष्ट होत आहे. कोरोनाची संख्या वाढल्यानंतर आम्ही बाहेर पडू असा काहीसा प्रकार दिसत आहे.तर अवैध धंद्याच्या अड्डाचा उत्तम कारभार कोरोनाच्या वाढीस चालना देत आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here